सकाळ डिजिटल टीम
नाशिकमधील नवश्या गणपती मंदिर हे लोकप्रिय व प्रसिध्द श्रद्धास्थान आहे.
नवसाला पावनाऱ्या या नवश्या गणपती मंदिराचा इतिहास जाणून घ्या.
नवश्या गणपती मंदिराची स्थापना 1774 मध्ये राघोबा दादा आणि आनंदीबाई यांनी केली होती.
आनंदीबाईंना मुलगा झाल्यावर त्यांनी येथे मंदिर बांधण्याचा नवस केला होता, त्यामुळे या गणपतीला 'नवश्या गणपती' असे नाव पडले.
हे मंदिर पेशव्यांच्या काळाची एक महत्त्वाची खूण आहे. आनंदीबाईंच्या गढीचे अवशेषही मंदिराच्या जवळ होते. अले म्हंटले जाते.
नवश्या गणपती हे एक अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते आणि राज्यभरातून अनेक भाविक येथे नवस मागण्यासाठी येत असतात.
1990 च्या दशकात संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली.
या मंदिराला पेशवेकालीन इतिहास आहे आणि ते नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद यांची दर्गाह आहे.