सकाळ डिजिटल टीम
बंधु-भगिनींच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधण, या सणाची सुरुवात कधी झाली आणि त्याचा इतिहास काय आहे जाणून घ्या.
रक्षाबंधन अनेक पौराणिक कथांशी जोडलेले आहे, ज्यामुळे या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला. कृष्णाने या बदल्यात द्रौपदीला कोणत्याही संकटात रक्षण करण्याचे वचन दिले. ही कथा सर्वाधिक लोकप्रिय मानली जाते.
१६ व्या शतकात, चित्तोडची राणी कर्णावती हिने गुजरातच्या बहादूर शाहच्या हल्ल्यापासून संरक्षण मागण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवली होती. हुमायूने राखीचा मान राखत चित्तोडला मदत केली.
भागवत पुराणानुसार, जेव्हा भगवान विष्णू बळीराजाच्या दरबारात राहू लागले, तेव्हा लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून विष्णूंना परत वैकुंठाला पाठवण्याची विनंती केली.
यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या विनंतीवरून तिला भेटायला जाण्याचे वचन दिले आणि यमुनेने यमाला राखी बांधली, ज्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त झाले. यावरून भावाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली जाते.
रक्षाबंधन सण केवळ भाऊ-बहिणीपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक एकोपा आणि संरक्षणाची भावना वाढवतो. गुरु-शिष्य, पुरोहित-यजमान यांच्यातही रक्षाबंधनाची प्रथा आढळ्याचे म्हंटले जाते.
उत्क्रांती आणि आधुनिकीकरण काळानुसार या सणाच्या स्वरूपात बदल झाले असले तरी, त्याचा मूळ उद्देश - प्रेम, आदर आणि संरक्षणाची भावना - कायम राहिली आहे. आता यात मिठाई आणि भेटवस्तूंचाही समावेश असतो.
भारताच्या विविध भागांमध्ये रक्षाबंधनाशी संबंधित वेगवेगळ्या स्थानिक कथा प्रचलित आहेत, ज्या या सणाच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाला हातभार लावतात.