समोसा: एक परदेशी पाहुणा की स्वदेशी चव?

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय पदार्थ

समोसा हा खूप लोकप्रिय पदार्थ आहे पण हा समोसा कोणी आणि कसा तयार केला तुम्हाला माहित आहे का? काय आहे या समोशाचा इतिहास जाणून घ्या.

Samosa | sakal

समोशाचा जन्म

समोशाचा जन्म साधारणतः १० व्या शतकात मध्यपूर्वेत झाला असे मानले जाते. 'संबासा' किंवा 'संभुसक' या नावाने तो ओळखला जात असल्याचे म्हंटले जाते.

Samosa | sakal

त्रिकोणी पेस्ट्री

पर्शियन भाषेत 'संबासा' या शब्दाचा अर्थ 'त्रिकोणी पेस्ट्री' असा होतो, जो समोशाच्या आकाराशी जुळतो.

Samosa | sakal

व्यापारी

मध्यपूर्वेतील व्यापारी, प्रवासी आणि सैनिक यांच्यामुळे हा पदार्थ मध्य आशिया, आफ्रिका आणि नंतर भारतात पोहोचला असे म्हंटले जाते.

Samosa | sakal

इब्न बतूता

प्रसिद्ध प्रवासी इब्न बतूता यांनी त्यांच्या नोंदीमध्ये समोशाचा उल्लेख केला आहे. त्यांनी समोशाचे मांस, नट आणि मसाले भरलेला एक छोटा त्रिकोणी पदार्थ असे वर्णन केला आहे.

Samosa | sakal

भारतातील बदल

भारतात आल्यानंतर समोशात स्थानिक घटकांचा वापर सुरू झाला. बटाटा, वाटाणा आणि विविध भारतीय मसाले भरून समोशाला आजचे स्वरूप प्राप्त झाले.

Samosa | sakal

स्थानिक पदार्थ

मूळ समोसा मांसाहारी असला तरी, भारतात तो प्रामुख्याने शाकाहारी स्वरूपात अधिक लोकप्रिय झाला.

Samosa | sakal

आधुनिक समोसा

आज आपण खातो तो समोसा हा अनेक शतकांच्या खाद्यसंस्कृतीच्या विकास आणि मिश्रणाचे प्रतीक मानला जातो.

Samosa | sakal

समोशाचा शोध

समोशाचा शोध कोणी एका व्यक्तीने लावला नाही, तर तो ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बदलांमुळे विकसित होत गेला असे म्हंचले जाते.

Samosa | sakal

आरोग्यदायी आयुष्यासाठी नाचणीची भाकरी ठरते 'सुपरफूड'

Nachni Bhakri | sakal
येथे क्लिक करा