तंदूर रोटी भारतात कधी आली आणि कोणी आणली?

संतोष कानडे

तंदूर

तंदूरमध्ये रोटी भाजण्याची परंपरा भारतात हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात.

राजस्थान

राजस्थानमधील कालीबंगन येथे हडप्पा संस्कृतीच्या काळातील मातीच्या भट्ट्यांचे अवशेष सापडले आहेत.

मध्य आशिया

मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि पर्शिया या भागांतही तंदूरसारख्या भट्ट्यांचा वापर केला जात होता.

अफगाण

मध्ययुगात तुर्क आणि अफगाण लोकांच्या माध्यमातून तंदूरचा वापर उत्तर भारतात अधिक प्रचलित झाला.

नान

दिल्लीतील सुलतानांच्या काळातही तंदूरमध्ये भाजल्या जाणाऱ्या नानचा उल्लेख आढळतो.

मुघल काळ

मुघल काळात तंदूरी पदार्थांना राजदरबारात विशेष महत्त्व मिळाले.

जहांगीर

जहांगीरला तंदूरमध्ये बनवलेले पदार्थ आवडत असल्याचे उल्लेख आहेत.

प्रवास

जहांगीरच्या काळात प्रवासात सोबत नेता येणाऱ्या लहान तंदूरचा वापर सुरू झाल्याचे सांगितले जाते.

पंजाब

पंजाबमध्ये सामुदायिक तंदूरची परंपरा विकसित झाली. गावातील लोक एकाच तंदूरमध्ये आपल्या घरच्या पिठाच्या रोट्या भाजत असत.

खाद्यपरंपरा

आज लोकप्रिय असलेली तंदूर रोटी ही मध्य आशियाई प्रभाव, उत्तर भारतीय खाद्यपरंपरा आणि पंजाबी संस्कृती यांच्या संगमातून विकसित झाली.

एक रुपयाच्या नोटेवर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी का नसते?

<strong>येथे क्लिक करा</strong>