संतोष कानडे
भारतात एक रुपयाची नोट इतर चलनी नोटांपेक्षा वेगळी असते, हे तुम्हाला मुळात माहीत आहे का?
कारण एक रुपयाची नोट भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जारी करत नाही.
तर ही नोट थेट भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून जारी केली जाते.
त्यामुळे तिच्यावर RBI गव्हर्नरची नव्हे, तर भारताच्या अर्थसचिवांची स्वाक्षरी असते.
यामागे ब्रिटिश काळापासून चालत आलेला ऐतिहासिक नियम आहे.
१९३५ मध्ये RBI ची स्थापना झाली; मात्र एक रुपयाची नोट जारी करण्याचा अधिकार सरकारकडेच राहिला.
भारतीय चलन कायद्यानुसार एक रुपयाची नोट ही चलनी नोट असली, तरी ती भारत सरकारची देयता मानली जाते.
मग या नोटेची छपाई कोण करतं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
एक रुपयाच्या नोटेची छपाई महाराष्ट्रातील नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस येथे सुरू झाली होती.
हा छापखाना केंद्र सरकारच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत येतो.
एक रुपयाची नोट जारी करण्याचा अधिकार सरकारकडे आणि तिची छपाई करण्याची जबाबदारी सरकारी छापखान्याकडे असते.
म्हणूनच एक रुपयाची नोट ही भारताच्या चलनव्यवस्थेतील एक खास आणि ऐतिहासिक ओळख मानली जाते.
face wash
esakal