सकाळ डिजिटल टीम
ताजमहाल हे भारतातील एक जागतिक वारसा स्थळ असून प्रेमाचे अमर प्रतीक म्हणून ओळखले जाते.
Taj Mahal Old Name
esakal
मुघल सम्राट शाहजहानने आपली प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ या भव्य वास्तूची निर्मिती केली. संगमरवरी दगडातून साकारलेले हे अद्वितीय स्मारक आजही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरते.
Taj Mahal Old Name
esakal
मात्र, फारच कमी लोकांना माहिती आहे की ताजमहालचे मूळ नाव 'ताजमहाल' नव्हते. इतिहासाच्या पानांत डोकावल्यास या वास्तूचे प्रारंभीचे नाव वेगळे होते.
Taj Mahal Old Name
esakal
मुमताज महलच्या निधनानंतर तिला या स्मारकात दफन करण्यात आले. त्या वेळी या थडग्याचे नाव 'रौजा-ए-मुनाव्वारा' असे ठेवण्यात आले होते. 'रौजा' म्हणजे थडगे तर 'मुनाव्वारा' म्हणजे तेजस्वी किंवा प्रकाशमान म्हणजेच 'तेजस्वी थडगे'.
Taj Mahal Old Name
esakal
कालांतराने लोकांच्या तोंडून आणि इतिहासाच्या प्रवासात या स्मारकाला 'ताजमहाल' हे नाव रूढ झाले. आज ताजमहालमध्ये मुमताज महल, तसेच शाहजहान यांची समाधी आहे. काही इतिहासकारांच्या मते शाहजहानच्या इतर पत्नींचे अवशेषही येथे असल्याचे सांगितले जाते.
Taj Mahal Old Name
esakal
तरीसुद्धा, ताजमहाल हे मुख्यत्वे शाहजहान आणि मुमताज यांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणूनच ओळखले जाते.
Taj Mahal Old Name
esakal
'रौजा-ए-मुनाव्वारा' पासून 'ताजमहाल' पर्यंतचा हा प्रवास इतिहास, प्रेम आणि वास्तुकलेचा अद्भुत संगम दर्शवतो.
Taj Mahal Old Name
esakal
Queen Nzinga History
esakal