लैंगिक संबंधानंतर पुरुषांना जिवंत जाळणारी 'ही' आहे इतिहासातील सर्वात क्रूर राणी

सकाळ डिजिटल टीम

वादग्रस्त व्यक्तिमत्त्व

इतिहासात अनेक राण्या त्यांच्या शौर्य, नेतृत्व आणि पराक्रमासाठी ओळखल्या जातात. मात्र, काही शासक त्यांच्या क्रूरतेमुळेही इतिहासात लक्षात राहिल्या आहेत. अशाच वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे राणी न्झिंगा.

Queen Nzinga History

|

esakal

राणी न्झिंगा कोण होत्या?

राणी न्झिंगा या १७ व्या शतकात आफ्रिकेतील न्डोंगो आणि माताम्बा या दोन महत्त्वाच्या राज्यांच्या शासक होत्या. त्या एक कुशल योद्धा आणि राजकारणात पारंगत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या.

Queen Nzinga History

|

esakal

युरोपियन वसाहतवाद

युरोपियन वसाहतवादाविरुद्ध त्यांनी दीर्घकाळ कठोर संघर्ष केला आणि आपल्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी झुंज दिली.

Queen Nzinga History

|

esakal

राणीचे ऐतिहासिक महत्त्व

मात्र, त्यांच्या कारकीर्दीशी संबंधित अनेक घटना आजही वादग्रस्त मानल्या जातात. सत्तेसाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या भावाचा वध केल्याची कथा इतिहासात नमूद केली जाते. युद्धकाळातील त्यांच्या धोरणांबाबतही अनेकदा कठोर टीका करण्यात आली आहे.

Queen Nzinga History

|

esakal

पुरुषांशी लैंगिक संबंध

राणी न्झिंगाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक भीषण कथा सांगितल्या जातात. काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार, पुरुषांशी संबंध ठेवल्यानंतर ती त्यांना जिवंत जाळत असे.

Queen Nzinga History

|

esakal

पुरुषांचा मानसिक छळ

तसेच त्यांच्या शाही हरममधील पुरुषांना महिलांचे कपडे परिधान करण्यास भाग पाडले जाई आणि त्यांच्यावर मानसिक छळ केला जाई, अशीही माहिती आढळते.

Queen Nzinga History

|

esakal

राणी न्झिंगा क्रूर का मानल्या जातात?

या सर्व कथांमुळे राणी न्झिंगा यांची प्रतिमा एकीकडे धैर्यवान आणि स्वातंत्र्यलढ्याची प्रतीक ठरते, तर दुसरीकडे ती अत्यंत क्रूर आणि निर्दयी शासक म्हणूनही ओळखली जाते. त्यामुळे इतिहासात त्यांचे नाव आजही गंभीरपणे वादग्रस्त मानले जाते.

Queen Nzinga History

|

esakal

Kovidar Tree : अयोध्येच्या धर्मध्वजावरचा 'कोविदार' नक्की कोणता वृक्ष? रामायणात काय आहे उल्लेख?

Importance of Kovidar Tree

|

esakal

येथे क्लिक करा...