कपाट कोणी शोधले? साध्या कोनाड्यापासून आलमारीपर्यंतचा थक्क करणारा इतिहास!

सकाळ डिजिटल टीम

कपाटाचा शोध

आपण कपडे ठेवण्यासाठी वारत असलेल्या कपाटाचा शोध कोणी आणि कसा लावला जाणून घ्या.

cupboard history

|

sakal 

प्राचीन काळ

कपाटाचा सर्वात प्राथमिक उगम प्राचीन इजिप्तमध्ये झाला. सुरुवातीला मानवाने भिंतीत दगडी कोनाडे करून वस्तू ठेवण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी लाकडी पेट्या (Chests) तयार केल्या, ज्या आधुनिक कपाटाचा पाया मानल्या जातात.

cupboard history

|

sakal 

आर्मारियम

'कपाट' या शब्दासाठी इंग्रजीत वापरला जाणारा 'Armoire' हा शब्द लॅटिन शब्द 'Armarium' पासून आला आहे. रोममध्ये याचा उपयोग प्रामुख्याने शस्त्रे (Arms) ठेवण्यासाठी केला जात असे, म्हणून त्याला हे नाव पडले.

cupboard history

|

sakal 

युरोपमधील प्रेस

मध्ययुगीन काळात युरोपमध्ये उंच लाकडी कपाटे वापरली जाऊ लागली, त्यांना 'प्रेस' म्हटले जाई. यात कपड्यांपेक्षा अधिक मौल्यवान हस्तलिखिते आणि धार्मिक पुस्तके जपून ठेवली जात असत.

cupboard history

|

sakal 

पेट्यांचे रूपांतर कपाटात

सुरुवातीला वस्तू आडव्या पेट्यांमध्ये ठेवल्या जायच्या. पण जागेची बचत करण्यासाठी आणि वस्तू शोधणे सोपे जावे म्हणून या पेट्या उभ्या करून त्यांना दरवाजे आणि कप्पे लावण्यात आले, यातूनच खऱ्या अर्थाने कपाटाचा 'आकार' निश्चित झाला.

cupboard history

|

sakal 

'वॉर्डरोब' शब्दाचा जन्म

फ्रेंच भाषेत 'Garder' (रक्षण करणे) आणि 'Robe' (पोशाख) या शब्दांवरून 'वॉर्डरोब' हा शब्द तयार झाला. सुरुवातीला हा एक स्वतंत्र खोलीचा भाग असायचा, जिथे कपडे टांगले जात असत.

cupboard history

|

sakal 

स्टील कपाट

१९ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर कपाटांचे उत्पादन लाकडाऐवजी धातूमध्ये होऊ लागले. यामुळे कपाटे अधिक मजबूत आणि आगीपासून सुरक्षित झाली.

cupboard history

|

sakal 

भारतातील 'गोदरेज' क्रांती

भारतात कपाटाचा इतिहास अर्देशीर गोदरेज यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. १९२३ मध्ये त्यांनी भारतातील पहिले स्टील कपाट (Storewel) बाजारात आणले. त्याकाळी 'गोदरेजची आलमारी' असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई.

cupboard history

|

sakal 

इन-बिल्ट

२१ व्या शतकात जागेच्या कमतरतेमुळे 'इन-बिल्ट' (भिंतीत बसवलेली) आणि 'स्लाईडिंग' कपाटांचा शोध लागला. आज कपाट हे केवळ साठवणुकीचे साधन नसून ते घराच्या इंटिरिअर डिझाइनचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे.

cupboard history

|

sakal 

निवडणुकीची शाई कधी आणि कुणी बनवली?

Election Ink

|

ESakal

येथे क्लिक करा