सकाळ डिजिटल टीम
प्राचीन काळी आणि मध्ययुगात लोक नखे कापण्यासाठी छोटे चाकू किंवा धारदार कट्यारीचा वापर करत असत. हे काम अत्यंत कौशल्याचे असायचे, कारण थोडीही चूक झाल्यास बोटाला जखम होण्याचा धोका असायचा
Nail Cutter
sakal
आदिमानव किंवा ग्रामीण भागातील लोक नखे कापण्याऐवजी ती खडबडीत दगडावर घासून लहान करत असत. यामुळे नखे आपोआप घासली जाऊन योग्य आकारात राहत असत.
Nail Cutter
sakal
जेव्हा कात्रीचा शोध लागला, तेव्हा विशेषतः श्रीमंत वर्गातील लोक नखे कापण्यासाठी लहान आणि धारदार कात्रीचा वापर करू लागले. आजही अनेक देशांत नेलकटरपेक्षा कात्रीने नखे कापण्याला पसंती दिली जाते.
Nail Cutter
sakal
अनेक लोक नखे कापण्यासाठी कोणत्याही साधनाचा वापर न करता ती दातांनी चावून लहान करत असत. जरी ही पद्धत अस्वच्छ मानली जात असली, तरी ती सर्वात जुनी आणि सोपी पद्धत होती.
Nail Cutter
sakal
जुन्या काळी साधने फारशी धारदार नसल्यामुळे लोक नखे कापण्यापूर्वी ती कोमट पाण्यात बराच वेळ भिजवून ठेवत असत, जेणेकरून ती मऊ होतील आणि सहज कापली जातील.
Nail Cutter
sakal
पूर्वीच्या काळी राजे-महाराजे किंवा श्रीमंत व्यक्ती स्वतःची नखे स्वतः न कापता 'न्हाव्या'कडून (Barber) कापून घेत असत. त्यासाठी न्हाव्याकडे खास छोटी वस्तरे असायची.
Nail Cutter
sakal
काही संस्कृतींमध्ये नखे कापण्यासाठी ठराविक दिवस पाळले जात असत. साधने उपलब्ध नसल्याने नखे खूप वाढू नयेत म्हणून ती वेळोवेळी आगीच्या जवळ नेऊन किंवा गरम वस्तूने थोडी जाळून (Singing) लहान केली जात असल्याच्याही काही नोंदी आढळतात.
Nail Cutter
sakal
नेलकटरचा पहिला अधिकृत पेटंट १८७५ मध्ये व्हॅलेंटाईन फॉगर्टी (Valentine Fogerty) यांनी नोंदवला. त्यानंतर खऱ्या अर्थाने आधुनिक 'लीव्हर स्टाईल' नेलकटर घराघरात पोहोचले.
Nail Cutter
sakal
Aluminium
esakal