सकाळ डिजिटल टीम
रामशेज किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व लोकप्रिय किल्ला आहे.
रामशेज या किल्ल्याला 'रामाचा पलंग' असेही म्हटले जाते, कारण असा समज आहे की भगवान राम यांनी येथे काही काळ विश्रांती घेतली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल बादशहा औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रामशेज किल्ल्याने मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष दिली.
रामशेज हा किल्ला मराठ्यांनी साडेसहा वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता.
शिवरायांचे सेनापती पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी १६७१-७२ मध्ये रामसेज काबीज केले होते.
गडावरील ६०० मराठा सैनिकांनी तोफ नसतानाही अनेक महिने गोफण, पेटवलेली गवताची गंजी आणि मोठमोठे दगड मारून मुघल सैन्याला रोखून धरले.
मुघल सैनिकांनी शेवटी रामशेज किल्ल्यावर हल्ला केला आणि अनेक मराठा सैनिकांना ठार केले.
या कारणांमुळे रामशेज किल्ल्याला शिवकालीन शौर्याची साक्ष मानले जाते.
रामशेज किल्ल्यावर पर्यट मोठ्या संख्येने येतात. हा किल्ला नाशिक शहराच्या उत्तरेला 14 किलोमीटर अंतरावर नाशिक पेठ महामार्गावर आहे.