Sandip Kapde
संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, ही बातमी ऐकून शिवरायांना मोठा धक्का बसला.
त्यांना ही घटना स्वीकारणं अवघड वाटत होतं.
त्यांनी तत्काळ हुद्देदार जानोजी भोसले यांना तुकाराम महाराजांच्या कुटुंबाची चौकशी करण्यास सांगितले.
शिवरायांनी महाराजांचे चिरंजीव महादेव बुवा यांना दरबारात बोलावले.
भेटीनंतर शिवरायांनी महादेव बुवांना वर्षासन, एक खंडी धान्य व एक होनाची मोईन दिली.
छत्रपती संभाजीराजे यांनीही या परंपरेला पुढे चालना दिली.
नारायण बाबांनी पालखी सोहळ्याची सुरूवात केली.
तुकाराम बीजेचा उत्सवही त्या काळात सुरू करण्यात आला.
छत्रपती राजाराम महाराजांनी येलवाडी गाव इनाम दिले.
त्यांनी अर्धे देहू गाव देवस्थानास इनाम म्हणून दिले.
नंतर दुसऱ्या शिवाजी महाराजांनी संपूर्ण देहू गाव इनाम दिले.
स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी १६४५ पासून चळवळ गतिमान केली.
याच काळात स्वराज्यविषयीचे दोन महत्त्वाचे पत्रे लिहिण्यात आली.
शिवरायांना संत तुकाराम महाराजांबद्दल अत्यंत आदर होता.
त्यांच्या वैकुंठगमनानंतरही शिवरायांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली