Holi 2024 : होळी खेळा पण जरा जपून

Monika Lonkar –Kumbhar

भारतात सगळीकडे आज होळीचा उत्साह पहायला मिळतोय.

होलिका दहन झाले की, दुसऱ्या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते.

परंतु, होळीत वापरले जाणारे रसायनयुक्त रंग फक्त त्वचेसह डोळ्यांसाठीच नाहीत, तर गर्भवतीसह गर्भातील बाळांसाठीही धोक्याचे ठरू शकतात.

रंग तयार होतात रासायनिक घटकांपासून

लाल रंग : लाल रंगात पारा सल्फाइट नावाचे रसायन असते. त्यामुळे त्वचेचे विकार तसेच कॅन्सरची शक्यता असते.

जांभळा रंग

हा रंग क्रोमियम आणि ब्रोमाइटपासून बनतो. डोळ्यात रंग गेल्यास डोळा निकामी होण्याची शक्यता असते.

हिरवा रंग

हा रंग कॉपर सल्फेटपासून बनतो. यामुळे त्वचेची जळजळ होते. शिवाय, हा रंग डोळ्यांसाठी धोकादायक मानला जातो.

‘रंगाचे पाणी, रंग डोळ्यात जाऊ नये यासाठी साधा चष्मा किंवा गॉगलचा वापरावा. 

Holi 2024 : चेहऱ्यावरील रंग जात नाही? मग, करा 'हे' घरगुती उपाय