Yashwant Kshirsagar
हिंदू पंचांगानुसार होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो.
यावर्षी धुलिवंदन 14 मार्च रोजी आणि होलिका दहन 13 मार्चला होणार आहे.
असं म्हटलं जाते की, होळी खूपच शुभ सण असतो, त्यामुळे घरातून काही वस्तू बाहेर टाकून दिल्या पाहिजेत.
अशुभ वस्तू होळीच्याधीच घराबाहेर फेकल्या पाहिजेत, तर जाणून घेऊया अशुभ वस्तुंविषयी
घरात जर तुटलेली मुर्ती असेल तर ते अशुभ मानले जाते, अशी मुर्ती घरात नकारात्मकता निर्माण करते. त्यामुळे ती घरात ठेवू नये.
खराब घड्याळ हे घरात ठेवणे अशुभ मानले जाते. घराब घड्याळ हे खराब वेळेचा संकेत देते.
घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेला काचेचे सामान ठेवणे अशुभ मानले जाते, त्यामुळे ते होळीआधीच घराबाहेर काढावे.
फाटलेले बुट आणि चपलांमुळे घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य येते, धनाची कमरतता जाणवते.
(सूचना: वरील लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे, सकाळ याची पुष्टी करत नाही.)