सकाळ डिजिटल टीम
होळी हा सण सर्वत्र आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या सणाचा इतिहास काय आहे आणि पहिली होळी कधी व कुठे साजरी झाली जाणून घ्या.
Holi History
sakal
पौराणिक मानयतेनुसार, होळीची सुरुवात सत्ययुगात झाली. ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू असल्याचे मानले जाते, ज्याचा उल्लेख प्राचीन पुराणांमध्ये आढळतो.
Holi History
sakal
प्राचीन काळी या सणाला 'होलाका' किंवा 'होलिका' या नावाने ओळखले जात असे. 'होलाका' म्हणजे अर्धे भाजलेले धान्य (होळे), जे अग्नीला अर्पण करण्याची प्रथा होती.
Holi History
sakal
असुर राजा हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून न जळण्याचे वरदान होते. तिने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला, परंतु प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून खाक झाली. तेव्हापासून अनिष्टाचा नाश म्हणून होळी पेटवली जाते.
Holi History
sakal
रंगांच्या होळीची (धुलिवंदन) सुरुवात द्वापार युगात वृंदावन आणि मथुरा येथे भगवान श्रीकृष्णाने केल्याचे मानले जाते. कृष्णाने राधा आणि गोपींसोबत रंगांनी खेळण्याची प्रथा सुरू केली.
Holi History
sakal
होळीचा उल्लेख सातव्या शतकातील सम्राट हर्षवर्धनाच्या 'रत्नावली' या नाटकात आढळतो. तसेच जैमिनी मीमांसा आणि काठक गृह्यसूत्रातही या सणाचे वर्णन आहे.
Holi History
sakal
दक्षिण भारतात अशी मान्यता आहे की, याच दिवशी भगवान शिवानी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले होते. म्हणून तिथे होळीला 'मदनोत्सव' असेही म्हणतात.
Holi History
sakal
मुघल काळातही होळी साजरी केली जात असे. सम्राट अकबर आणि जहांगीर यांच्या काळात या सणाला 'ईद-ए-गुलाबी' किंवा 'आब-ए-पाशी' (रंगांची बरसात) असे म्हटले जाई.
Holi History
sakal
होळी हा मुळात नवान्न पौर्णिमेचा उत्सव आहे. शेतातील नवीन पीक (गहू, हरभरा) अग्नीला अर्पण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
Holi History
sakal
Malavya Rajyoga benefits lucky zodiac signs
Sakal