Holi Safety Tips for Kids: पालकांनो! मुलांना रंग खेळू देताना 'या' महत्त्वाच्या खबरदारी घ्या

Monika Shinde

होळी / रंगपंचमीचा सण

होळी / रंगपंचमीचा सण आनंदाचा असला तरी मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. रंग खेळताना थोडी काळजी घेतल्यास सण अधिक सुरक्षित आणि आनंदी होऊ शकतो.

नैसर्गिक किंवा हर्बल रंगांचा वापर

नेहमी नैसर्गिक किंवा हर्बल रंगांचा वापर करा. केमिकलयुक्त रंगांमुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ, खाज किंवा ऍलर्जी होऊ शकते.

मुलांच्या त्वचेवर आणि केसांवर तेल लावा

रंग खेळण्यापूर्वी मुलांच्या त्वचेवर आणि केसांवर तेल लावा. यामुळे रंग सहज निघतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.

डोळ्यांची काळजी घ्या

मुलांच्या डोळ्यांमध्ये रंग जाऊ नये याची काळजी घ्या. शक्य असल्यास त्यांना चष्मा वापरायला सांगा आणि चेहऱ्यावर जबरदस्तीने रंग लावू नका.

फुगे फेकताना सुरक्षित अंतर ठेवा

पाण्याने भिजलेले रंग किंवा फुगे फेकताना सुरक्षित अंतर ठेवा. जोरात फेकलेले फुगे दुखापत करू शकतात.

फुल कपडे घाला

मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. यामुळे त्वचेचा थेट रंगांशी संपर्क कमी होतो आणि ऍलर्जीचा धोका घटतो.

मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालावी

रंग खेळल्यानंतर मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालावी. सौम्य साबण किंवा मुलांसाठी सुरक्षित क्लिन्झर वापरणे उत्तम ठरते.

मुलांवर सतत लक्ष ठेवा

होळी खेळताना मुलांवर सतत लक्ष ठेवा. योग्य खबरदारी घेतल्यास सण आनंददायी आणि सुरक्षित दोन्ही ठरतो.

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना काय करावे आणि काय टाळावे?

येथे क्लिक करा