Aarti Badade
लोणावळ्याची प्रसिद्ध कॉर्न भजी आता तुमच्याही घरात बनवा – तीव्र चव, कुरकुरीत मजा!
1 कप उकडलेले कॉर्न दाणे,2 चमचे आले-मिरची पेस्ट,2 चमचे बेसन,2 चमचे कॉर्नफ्लोर,2 चमचे तांदळाचं पीठ,चवीनुसार मीठ, तिखट, आमचूर,बारीक चिरलेली कोथिंबीर,तळण्यासाठी तेल
कॉर्न उकडून निथळून घ्या. हाच आपल्या भज्यांचा बेस!
कॉर्नमध्ये बेसन, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोर, आलेमिरची पेस्ट, मीठ, तिखट, आमचूर व कोथिंबीर घालून थोडंसं पाणी टाका. सगळं मिक्स करा.
कढईत तेल गरम करा. तयार मिश्रणाचे छोटे भाग करून तळा, कुरकुरीत होईपर्यंत!
तळलेल्या कॉर्न भज्यांना गरमागरम चहा किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा!
लोणावळा स्टाईल भजी उन्हाळयात संध्याकाळी पावसाचे वातावरण होतंय. मस्त मुलांच्यासाठी एकदा ट्राय करा ही कॉर्न भजी.