Sunflower Plant Care: घरच्या गॅलरीत सूर्यफूल लावायचंय? हे सोपे टिप्स आधी वाचा!

Monika Shinde

गॅलरीत

गॅलरीत थोडी हिरवळ हवी असेल, तर सूर्यफूल हा उत्तम पर्याय आहे. योग्य काळजी घेतली तर हे फूल कुंडीतही छान फुलते.

Sunflower Gardening Tips

|

esakal

सूर्यफूल

सूर्यफूल लावण्यासाठी फार मोठी जागा लागत नाही. खोल कुंडी आणि थेट सूर्यप्रकाश मिळणारी गॅलरी असेल, तर रोप सहज वाढते.

Sunflower Gardening Tips

|

esakal

बी पेरण्यासाठी

बी पेरण्यासाठी फेब्रुवारी ते मे हा काळ योग्य मानला जातो. या काळात हवामान मध्यम असल्याने अंकुरण वेगाने होते.

Sunflower Gardening Tips

|

esakal

कुंडीत

सूर्यफूल कुंडी किमान १२–१५ इंच खोल असावी. खाली पाणी निथळण्यासाठी छिद्र करा, तर मुळे निरोगी राहतात आणि झाड मजबूत वाढते.

Sunflower Gardening Tips

|

esakal

६ तास ऊन मिळणे आवश्यक

दररोज किमान ६ तास ऊन मिळणे सूर्यफुलासाठी आवश्यक आहे. ऊन कमी मिळाल्यास झाड वाढते, पण फुलं लहान राहतात.

Sunflower Gardening Tips

|

esakal

पाणी टाका

माती कोरडी वाटली किंचित पाणी टाका. जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात, म्हणून पाणी देताना नेहमी संतुलन ठेवा.

Sunflower Gardening Tips

|

esakal

सेंद्रिय खत

पेरणीनंतर १५–२० दिवसांनी सेंद्रिय खत टाका. वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत वापरल्यास झाडाची वाढ अधिक चांगली होते.

Sunflower Gardening Tips

|

esakal

घरात सकारात्मक वातावरण

योग्य ऊन, पाणी आणि खत मिळाल्यास गॅलरीत उमललेले सूर्यफूल घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते आणि दिवसाची सुरुवात आनंदी करते.

Sunflower Gardening Tips

|

esakal

सकाळी उठल्यावर ओव्याचं पाणी प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतात?

येथे क्लिक करा