दातातल्या काळ्या किडेमुळे हैराण आहात? किचनमधल्या ‘या’ गोष्टी देऊ शकतात आराम

Anushka Tapshalkar

दातांच्या समस्या वाढतायत?

दात पिवळे होणे, किड, खड्डे, हिरड्यांतून रक्त येणे या समस्या अनेकांना त्रास देतात. वेळेत काळजी घेतली नाही तर त्रास वाढू शकतो.

Dental Problems

|

sakal

घरगुती उपाय कधी उपयोगी ठरतात?

दात स्वच्छ ठेवणे, जंतू कमी करणे आणि किड वाढू न देण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करू शकतात. मात्र गंभीर त्रासात डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

Home Remedies

|

sakal

लसूण: जंतूंवर प्रभावी उपाय

लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल व अँटी-फंगल गुणधर्म असतात. कच्चा लसूण चावल्याने दातदुखी आणि जंतूंमुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.

Garlic

|

sakal

लिंबू: वेदना कमी करण्यास मदत

लिंबामध्ये व्हिटॅमिन C आणि आम्ल असते. लिंबाचा छोटा तुकडा चावून नंतर तोंड धुतल्यास जंतू कमी होण्यास मदत होते.

Lemon

| sakal

मीठाचे पाणी: तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी

खारट पाण्याने गुळण्या केल्यास जीवाणू कमी होतात, तोंडातील आम्ल संतुलित राहते आणि दातांवरील चिकटपणा कमी होतो.

Salt Water

|

sakal

तुरटी: दातदुखीवर तात्पुरता आराम

तुरटी टाकलेले पाणी तोंडात धरून धुतल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. हे पाणी पिऊ नये, फक्त गुळण्या कराव्यात.

Alum

|

sakal 

महत्त्वाची सूचना

हे उपाय केवळ घरगुती आणि तात्पुरते आहेत. दात किडले असतील, खड्डे वाढत असतील किंवा वेदना कायम असतील तर दंतवैद्याचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

Check with Dentist

|

sakal

त्वचेच्या प्रत्येक प्रकारानुसार एक्सफोलिएशन कसं करायचं?

आणखी वाचा