डार्क सर्कल्सना करा बाय-बाय! घरच्या घरी बनवा 7 आय मास्क

Aarti Badade

फ्रेश लूकसाठी सोपे उपाय

हिवाळ्यातील कोरडेपणामुळे डोळ्यांखाली सूज आणि डार्क सर्कल्स येतात. पार्लरमध्ये जाण्याऐवजी स्वयंपाकघरातील साहित्यापासून बनवलेले हे 'आय मास्क' नक्की ट्राय करा."

Dark circles home remedies

|

sakal

काकडी आणि गुलाबपाणी

काकडीचा रस काढून त्यात गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण डोळ्यांखाली १५ मिनिटे लावून ठेवा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि काळी वर्तुळे कमी होतात.

Dark circles home remedies

|

Sakal

गाजर आणि कोरफड मास्क

गाजराचा रस आणि कोरफडीचा गर एकत्र करून पेस्ट बनवा. हा मास्क लावल्याने डोळ्यांखालील सूज कमी होऊन त्वचा घट्ट होते.

Dark circles home remedies

|

Sakal

बटाट्याचा चमत्कार

बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. बटाट्याच्या चकत्या करून त्या डोळ्यांवर ठेवा किंवा त्याचा रस लावा. डार्क सर्कल्स घालवण्यासाठी हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे.

Dark circles home remedies

|

Sakal

कॉफी मास्क

कॉफीमधील कॅफिन रक्ताभिसरण सुधारते. कॉफी पावडर थोड्या पाण्यात मिसळून त्याची पेस्ट डोळ्यांखाली लावा. यामुळे डोळ्यांची सूज झटपट कमी होते आणि त्वचा उजळते.

Dark circles home remedies

|

Sakal

दह्याचा थंडावा

दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे डार्क सर्कल्सवर काम करते. दह्यात थोडे लिंबू पिळून ते डोळ्यांखाली लावल्याने सूज कमी होते आणि डोळे टवटवीत दिसतात.

Dark circles home remedies

|

Sakal

ग्रीन टी आणि काकडी

वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स किंवा ग्रीन टीमध्ये काकडीचा रस मिसळून डोळ्यांखाली लावा. यातील अँटी-ऑक्सिडंट्स थकलेल्या डोळ्यांना त्वरित आराम देतात.

Dark circles home remedies

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

कोणताही मास्क लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. अधिक समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दररोज ७-८ तास झोप आणि पुरेसे पाणी डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Dark circles home remedies

|

Sakal

महिलांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका! 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Lung cancer in women causes

|

sakal

येथे क्लिक करा