महिलांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका! 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Aarti Badade

कर्करोगाचा वाढता धोका

भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संकट झपाट्याने वाढत आहे. 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च'नुसार,या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Lung cancer in women causes

|

Sakal

महिलांमध्ये वाढीचा वेग सर्वाधिक

धक्कादायक बाब म्हणजे, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा प्रसार वेगाने होत आहे. महिलांमध्ये हा वाढीचा दर वार्षिक ६.७% आहे, तर पुरुषांमध्ये तो ४.३% इतका आहे.

Lung cancer in women causes

|

Sakal

ईशान्य भारत ठरेल 'हॉटस्पॉट'

उत्तर-पूर्व भारतात या आजाराचा प्रभाव सर्वाधिक आहे. मिझोरामची राजधानी आइझॉल हे देशातील सर्वात मोठे 'हॉटस्पॉट' म्हणून पुढे आले आहे.

Lung cancer in women causes

|

sakal

केवळ धूम्रपान हेच कारण नाही!

पूर्वी केवळ धूम्रपान हे मुख्य कारण मानले जात असे. मात्र, आता धूम्रपान न करणाऱ्या महिलांमध्येही हा कर्करोग वाढत आहे. घरातील आणि बाहेरील वायुप्रदूषण हे यामागील सर्वात मोठे कारण ठरत आहे.

Lung cancer in women causes

|

Sakal

प्रदूषणाचा विळखा

जैवइंधनाचा वापर (चुलीचा धूर), दुसऱ्याच्या धुराचा संपर्क, खराब हवेची गुणवत्ता आणि व्यावसायिक प्रदूषण यामुळे फुफ्फुसाच्या पेशींचे नुकसान होत आहे.

Lung cancer in women causes

|

Sakal

कर्करोगाचा नवीन प्रकार

सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगात 'अॅडेनोकार्सिनोमा' हा प्रकार सर्वाधिक दिसून येत आहे. बेंगळुरूमध्ये महिलांमधील निम्म्याहून अधिक रुग्ण याच प्रकारातील असल्याचे समोर आले आहे.

Lung cancer in women causes

|

Sakal

उशिरा होणारे निदान

चिंतेची बाब म्हणजे, सुमारे ५०% रुग्णांचे निदान उशिरा होते. यामुळे उपचारांमध्ये अडचणी येतात. २०२३० पर्यंत शहरांमध्ये महिलांचे रुग्णप्रमाण प्रति लाख ८ पेक्षा अधिक होण्याची भीती आहे.

Lung cancer in women causes

|

Sakal

प्रतिबंधात्मक उपाय काय?

लवकर निदान करण्यासाठी नियमित तपासणी करा, वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवा आणि धुरापासून दूर राहा. जनजागृती आणि वेळीच उपचार हेच या जीवघेण्या आजारावर प्रभावी शस्त्र आहे.

Lung cancer in women causes

|

Sakal

गॅसला कायमचा रामराम! रात्री झोपताना प्या 'हे' पाणी...सकाळी पोट आपोआप साफ

Ayurvedic Home Remedy Digestion Cumin-Ajwain-Fennel

|

Sakal

येथे क्लिक करा