सकाळी उठताच चेहऱ्यावर हवाय 'नॅचरल ग्लो'? झोपण्याआधी लावा 'हा' मास्क!

Aarti Badade

रात्रीची त्वचा निगा का महत्त्वाची?

दिवसभरातील धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचा काळवंडते, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी योग्य काळजी घेतल्यास त्वचा पुन्हा टवटवीत होते.

face mask benefits

|

Sakal

कोरफड आणि गुलाब पाण्याचा मॅजिक मास्क

कोरफड जेलमध्ये थोडे गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

face mask benefits

|

Sakal

मुलायम त्वचेसाठी 'ओव्हरनाईट' उपाय

कोरफड मास्क रात्रभर चेहऱ्यावर ठेवल्यास त्वचा आतून मऊ आणि सॉफ्ट होते, तसेच उन्हाळ्यातील त्वचेची जळजळही कमी होते.

face mask benefits

|

Sakal

दुधाची साय आणि मधाचा वरदान मास्क

कोरड्या त्वचेसाठी दुधाची साय आणि मध अत्यंत गुणकारी असून, यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊन नैसर्गिक चमक येते.

face mask benefits

|

Sakal

साय मास्क लावताना 'ही' काळजी घ्या

दुधाची साय आणि मधाचे मिश्रण लावल्यानंतर थोड्या वेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ करावा, जेणेकरून चेहऱ्याला दुधाचा वास येणार नाही.

face mask benefits

|

Sakal

काकडी आणि कोरफडचा कूलिंग मास्क

उन्हाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी काकडीचा रस आणि कोरफड जेल एकत्र करून लावावे, यामुळे त्वचा कायम हायड्रेट राहते.

face mask benefits

|

Sakal

घरगुती उपायांनी टिकवा तारुण्य

महागड्या क्रीम्सऐवजी स्वयंपाकघरातील या नैसर्गिक वस्तूंचा वापर केल्यास सुरकुत्या कमी होऊन त्वचेवर कायम ग्लो टिकून राहतो.

face mask benefits

|

Sakal

तांदळाचे पाणी रात्रभर चेहऱ्यावर लावल्याने काय होईल?

Rice water on face overnight side effects

|

Sakal

येथे क्लिक करा