Monika Shinde
"दात किडणे" ही मुलांमध्ये सामान्य समस्या आहे, पण दुर्लक्ष केल्यास गंभीर होऊ शकते. काही घरगुती उपाय यावर उपयुक्त ठरू शकतात.
मुलांना सकाळ-संध्याकाळ ब्रश करायला शिकवा. 2 मिनिटे ब्रश करणे आणि योग्य ब्रश वापरणे आवश्यक आहे.
दात दुखत असल्यास कोमट खारट पाण्याने गुळण्या करायला सांगा. यामुळे जंतू मरतात आणि सूज कमी होते.
दात दुखत असल्यास लवंग तेल हातात घेऊन दुखणाऱ्या दातावर लावा. यामुळे वेदना कमी होतात.
गोड पदार्थांमुळे किड जास्त होते. चॉकलेट, मिठाई यांचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि खाल्ल्यावर ब्रश करायला सांगा.
गाजर, सफरचंद, काकडी यासारखी कच्ची फळे व भाजी खाण्याने दात स्वच्छ राहतात आणि हिरड्यांना मसाज मिळतो.
दर ६ महिन्यांनी मुलांना दंततज्ज्ञांकडे तपासणीसाठी नेणे आवश्यक आहे. लवकर निदान केल्यास उपचार सोपे होतात.