Monika Shinde
वय वाढत चाललंय आणि हाडं दुखायला लागली आहेत का? मग वेळेवर काळजी घेतली नाही तर ओस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो
हाडांसाठी कॅल्शियम अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात दूध, दही, पनीर, अंजीर, ब्रोकोली आणि बदाम यांचा समावेश करा. दररोज किमान एक ग्लास दूध पिण्याची सवय लावा.
व्हिटॅमिन D शिवाय कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही. दररोज सकाळी 15-20 मिनिटे सूर्यप्रकाशात बसल्याने हे व्हिटॅमिन नैसर्गिकरित्या मिळतं.
व्यायामामुळे हाडांची घनता टिकून राहते. वॉकिंग, योगा, स्ट्रेचिंग आणि हलकी वजन उचलण्याची व्यायामपद्धती हाडांसाठी फायदेशीर ठरते.
धूम्रपान आणि मद्यपान हाडांची झीज वाढवतात आणि शरीरातील कॅल्शियम कमी करतात. त्यामुळे त्यांचा त्याग करा.
जास्त मीठ खाल्ल्यास शरीरातून कॅल्शियमची गळती होते. आहारातील मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवा.
दीर्घकाळचा तणाव शरीरावर आणि विशेषतः हाडांवर परिणाम करतो. ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक विचार यांचा अवलंब करा.