Monika Shinde
मलासन हे एक सोपे योगासन आहे जे की घरी सहज करता येते.
दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे वेळ काढून मलासनासह इतर काही योगासने केली, तर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.
मलासनामुळे पोटावर हलका दाब पडतो, यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन यांसारख्या पचनविकारांपासून आराम मिळतो.
या आसनामुळे हिप्स, पायांच्या आतील भाग, कंबरेच्या स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि शरीरातील हालचालींमध्ये सुधारणा होते.
मलासनामुळे शरीर स्थिर राहते आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळण्यास मदत होते.
मलासन केल्याने गुडघे आणि टाच मजबूत होतात. वयानुसार होणाऱ्या सांधेदुखीपासून संरक्षण मिळते. मात्र गुडघ्यात वेदना असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मलासनामुळे शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.