Aarti Badade
औषधांव्यतिरिक्त काही नैसर्गिक उपाय मुलांना सर्दी व खोकल्यापासून आराम देतात – जाणून घ्या!
मुलांना पुरेशी झोप व उकळलेलं पाणी, सूप किंवा गरम हर्बल चहा द्या. शरीराला बळ मिळतं.
12 महिन्यांहून मोठ्या मुलांसाठी झोपण्याआधी 1 चमचा मध दिल्यास खोकल्यावर आराम मिळतो.
वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो, कफ बाहेर पडतो आणि बंध झालेले नाक उघडतं.
हळद आणि कोमट दूध खोकल्यावर गुणकारी – प्रतिकारशक्तीही वाढते.
तुळशी, आले, मिरे घालून तयार केलेला काढा सर्दी-खोकल्यावर चांगला उपाय आहे.
आल्याचा रस आणि मध एकत्र करून दिल्यास खवखवणारा खोकला कमी होतो.
कांद्याचा रस व लसणाचा अर्क हे दोन्ही खोकल्यावर प्रभावी घरगुती उपाय ठरतात.