सकाळ डिजिटल टीम
या गणेश चतुर्थीला गणपतीसाठी आगदी सोप्या पद्धतीने चॉकलेटचे मोदक कसे बनवायचे जाणून घ्या.
२०० ग्रॅम डार्क/मिल्क चॉकलेट, १/२ कप फ्रेश क्रीम, १ कप बिस्किट पावडर, १/२ कप डेसिकेटेड कोकोनट (सुके खोबरे), १ चमचा बटर (ऐच्छिक), १/४ कप पिठी साखर,मोदक साचा
एका मोठ्या भांड्यात बिस्किटांची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि पिठी साखर एकत्र करून घ्या.
एका लहान भांड्यात डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळवून घ्या. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा आणि त्यावर एक लहान भांडे ठेवून त्यात चॉकलेट आणि बटर घालून वितळवा.
वितळलेले चॉकलेट आणि क्रीम एकत्र करून चांगले मिसळा. या मिश्रणाला चॉकलेट गनाश म्हणतात. तयार केलेले चॉकलेट गनाश बिस्किटांच्या मिश्रणात थोडे थोडे घालून पीठ मळून घ्या. हे पीठ मऊ आणि गोळ्याप्रमाणे वळणारे असावे
आता मोदक साचा घेऊन त्याला आतून बटर लावून घ्या. यामुळे मोदक साच्याला चिकटणार नाहीत. साच्यामध्ये मळलेले पीठ थोडे थोडे दाबून भरा. मोदकाचा छान आकार येण्यासाठी पीठ चांगले दाबून भरा.
साचा बंद करून मोदक हळूच बाहेर काढा. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या.
तुम्ही मोदकाचे सारण भरण्यासाठी बदाम, काजू किंवा किसमिस वापरू शकता, जेणेकरून ते अधिक चवदार लागतील.
तयार झालेले मोदक किमान ३० मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. सेट झाल्यावर, हे स्वादिष्ट चॉकलेट मोदक तुम्ही गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता.