केस गळतीने त्रस्त आहात? घरीच बनवा जास्वंदाच्या फुलांचा शाम्पू!

सकाळ डिजिटल टीम

केमिकल-फ्री नैसर्गिक पर्याय

महागड्या ब्रँडेड शाम्पूऐवजी घरातील किंवा बागेतील ताज्या जास्वंदाच्या फुलांपासून आणि पानांपासून तुम्ही घरच्या घरी सहज नैसर्गिक शाम्पू बनवू शकता.

Hibiscus Shampoo

|

sakal 

सोपे साहित्य

हा शाम्पू तयार करण्यासाठी 7 ते 8 ताजी जास्वंदाची फुले, 10 ते 12 पाने, 2 चमचे कोरफड जेल आणि अर्धा कप पाणी इतकेच साहित्य लागते.

Hibiscus Shampoo

|

sakal 

फुले आणि पाने स्वच्छ धुणे

जास्वंदाची फुले आणि पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील धूळ निघून जाईल आणि त्यानंतर फुलांच्या मागचा हिरवा भाग काढून टाका.

Hibiscus Shampoo

|

sakal 

गुळगुळीत पेस्ट

स्वच्छ केलेली फुले, पाने आणि अर्धा कप पाणी मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करा; याच्या नैसर्गिक चिकटपणामुळे आणि हलक्या फेसामुळे केस स्वच्छ होण्यास मदत होते.

Hibiscus Shampoo

|

sakal 

कोरफड जेल

तयार झालेली पेस्ट एका वाटीत काढून त्यात 2 चमचे ताजे कोरफड जेल मिसळा, तुमचा घरगुती आणि केमिकल-फ्री शाम्पू तयार होईल.

Hibiscus Shampoo

|

sakal 

केसांना लावण्याची पद्धत

ओल्या केसांच्या मुळापासून टोकापर्यंत हे मिश्रण लावून 3 ते 4 मिनिटे बोटांनी हलका मसाज करा आणि हेअर मास्कप्रमाणे 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या.

Hibiscus Shampoo

|

sakal 

पाण्याने स्वच्छ धुणे

ठराविक वेळ झाल्यानंतर केस साध्या पाण्याने चांगले धुवून घ्या, ज्यामुळे केसांमधील अतिरिक्त घटक निघून जातील.

Hibiscus Shampoo

|

sakal 

पहिल्या वॉशमध्ये परिणाम

जास्वंदामधील अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन-सी तसेच कोरफडमुळे केस गळती कमी होते, ओलावा टिकून राहतो आणि पहिल्याच वॉशमध्ये केस रेशमी, चमकदार व बाउंसी दिसतात.

Hibiscus Shampoo

|

sakal 

खेकडा झाडावर चढून नारळ फोडू शकतो का?

Amazing Facts About Crabs

|

sakal 

आणखी वाचा