Puja Bonkile
रसमलाई प्रत्येकांचा आवडता गोड पदार्थ आहे.
प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हा गोड पदार्थ असतोच.
सर्वात आधी दूध, लिंबाचा रस, साखर, केसर, विलायची पावडर बदाम पिस्ता सर्व साहित्य गोळा करावे.
एका भांड्यात दूध गरम करा. नंतर लिंबाचा रस टाकून दूध फाडावे.
नंतर फाटलेले दूध आणि पाणी वेगळे करा. नंतर रुमलात बांधा. नंतर घट्ट गोळा तयार होतो. नंतर चांगले मळा आणि छोटे गोळे तयार करा. यामुळे रसमलाई मउसुत होतील.
नंतर रस बनवण्यासाठी एका भांड्यात दूध गरम करा त्यात साखर, केसर वेलची पावडर टाका.
नंतर दूध थंड करा.
२ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवा. नंतर सर्व्ह करताना बदाम पिस्ता टाका.