मध-दालचिनी एकत्र खाल्ल्याने खरंच होतात चमत्कारी फायदे? जाणून घ्या सत्य

Anushka Tapshalkar

मध आणि दालचिनीचं कॉम्बिनेशन

मध आणि दालचिनी या दोन्हींचे स्वतंत्र आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र, दोन्ही एकत्र घेतल्याने ‘चमत्कारी इलाज’ होतो, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

Honey-Cinnamon

|

sakal

मधाचे आरोग्यदायी फायदे

मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असून घसा खवखवणे आणि खोकल्यामध्येही मध आराम देऊ शकतो.

Honey

|

sakal

दालचिनीचे फायदे

दालचिनी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी म्हणजेच दाह कमी करण्यास मदत करणारे आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळतात.

cinnamon | sakal

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर?

मध आणि दालचिनीतील काही घटक सूज कमी करण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करू शकतात. मात्र, याला उपचारांचा पर्याय समजू नये.

heart health

|

Sakal

जखम भरून येण्यास मदत

विशेषतः वैद्यकीय दर्जाच्या मधाचा त्वचेवर योग्य पद्धतीने वापर केल्यास जखम भरून येण्यास मदत होऊ शकते. मात्र, कोणत्याही जखमेवर घरगुती मिश्रण लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Wound Healing

|

sakal

दालचिनी घेताना ‘ही’ काळजी घ्या

शक्य असल्यास Ceylon Cinnamon (खरी दालचिनी) निवडा. Cassia Cinnamon मध्ये coumarinचे प्रमाण जास्त असू शकते; त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

cinnamon | sakal

मध कसं घ्यावं?

कच्चं आणि कमी प्रक्रिया केलेलं मध निवडणे चांगले. तसेच उकळत्या पाण्यात किंवा चहात मध थेट घालण्याऐवजी पेय थोडं कोमट झाल्यावर मध मिसळा.

why does pure honey not spoil for years

|

esakal

केळीसोबत 'हा' मसाला खा आणि ब्लोटिंगला करा बाय बाय!

Banana & Black Pepper Detox Liver

|

sakal

आणखी वाचा