माणसाला डंख मारताच मधमाशी का मरते? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

Yashwant Kshirsagar

छोटासा डंख, मोठी किंमत

मधमाशीने माणसाला डंख केल्यावर ती मरते, हे आपण अनेकदा ऐकतो. पण एका छोट्या डंखामुळे तिला जीव का गमवावा लागतो? यामागे आश्चर्यकारक वैज्ञानिक कारण आहे.

Why Bees Die After Stinging

|

esakal

डंख मारल्याची किंमत

माणसाला डंख केल्यानंतर वेदना होतातच, पण त्याची मोठी किंमत खुद्द मधमाशीला मोजावी लागते. काही वेळातच ती मरते. तिच्या शरीराची रचनाच याला कारणीभूत असते.

Why Bees Die After Stinging

|

esakal

स्टिंगरची खास रचना

मधमाशीचा डंख मारणारा अवयव (स्टिंगर) साध्या सुईसारखा नसतो. तो पोकळ आणि टोकदार असतो. त्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कडांवर असलेले छोटे काटे किंवा अंकुश

Why Bees Die After Stinging

|

esakal

गळासारखे काटे

हे काटे मासे पकडण्याच्या गळासारखे किंवा हार्पूनसारखे असतात. जेव्हा मधमाशी मानवी त्वचेवर डंख करते, तेव्हा हे काटे त्वचेत अडकतात आणि अवयव घट्ट रोवला जातो.

Why Bees Die After Stinging

|

esakal

बाहेर का काढता येत नाही?

मानवी त्वचा जाड आणि लवचिक असते. डंख मारल्यानंतर मधमाशी उडून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा स्टिंगर त्वचेतच अडकून राहतो. ती तो सहज बाहेर काढू शकत नाही.

Why Bees Die After Stinging

|

esakal

शरीराचा भाग फाटतो

स्टिंगर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मधमाशीच्या शरीराचा खालचा भाग फाटतो. विष-पिशवी, स्नायू आणि पोटातील काही अंतर्गत अवयव तिच्या शरीरापासून वेगळे होतात.

Why Bees Die After Stinging

|

esakal

गंभीर जखम अन् मृत्यू

या प्रक्रियेमुळे पोटाच्या मागील भागात मोठी जखम होते. तज्ज्ञांच्या मते ही स्थिती मोठ्या प्रमाणात रक्त वाहून जाण्यासारखी असते. महत्त्वाचे द्रव आणि अवयव गमावल्याने मधमाशी मरते.

Why Bees Die After Stinging

|

esakal

वेगळे झाल्यानंतरही विष सोडतो

मधमाशी उडून गेल्यानंतर किंवा मेल्यानंतरही स्टिंगर सक्रिय राहतो. विष-पिशवी आणि स्नायू काही काळ सक्रिय राहून जखमेमध्ये सतत विष सोडत राहतात.

Why Bees Die After Stinging

|

esakal

सर्व डंखांनी मधमाशी मरते?

साधारणपणे मानव किंवा इतर सस्तन प्राण्यांना डंख मारल्यानंतर मधमाश्या मरतात. पण इतर कीटक किंवा पातळ त्वचा असलेल्या प्राण्यांना डंख मारल्यास त्या अनेकदा स्टिंगर बाहेर काढून जिवंत राहू शकतात.

Why Bees Die After Stinging

|

esakal

जीवन-मरणाची बाब

म्हणूनच मधमाशीसाठी एक डंख मारणे ही जीव-मरणाची बाब ठरते. तिची रचना अशी आहे की माणसासारख्या जाड त्वचेवर डंख मारणे तिच्यासाठी अत्यंत धोकादायक असते.

Why Bees Die After Stinging

|

esakal

विमान प्रवासात नारळ न्यायला का आहे बंदी? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहीतच नाही

Why Coconut Ban in Flight

|

esakal

येथे क्लिक करा