मध, गूळ आणि साखर यापैकी आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?

Aarti Badade

गोड पदार्थांबाबत गैरसमज

अनेकजण साखरेऐवजी गूळ किंवा मध अधिक आरोग्यदायी मानतात. मात्र, हे तिन्ही गोड पदार्थ योग्य प्रमाणातच सेवन करणे महत्त्वाचे आहे.

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

डायबिटीज असणाऱ्यांनी काय करावे?

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखर, गूळ आणि मध यांचे सेवन शक्यतो टाळावे. या तिन्हीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

मध गरम करून खाणे योग्य आहे का?

मध जास्त तापवणे किंवा उकळणे टाळावे. गरम केल्याने त्यातील काही गुणधर्म कमी होऊ शकतात. मध वापरताना तो पदार्थावर शेवटी घालणे अधिक योग्य ठरते.

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

गुळाबाबतही घ्या काळजी

गूळही जास्त तापमानावर उकळणे टाळावे. तोही मर्यादित प्रमाणातच सेवन करावा.

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

साखरेऐवजी दुसरा पर्याय?

सामान्य व्यक्ती मर्यादित प्रमाणात खजुराचा नैसर्गिक गोडवा वापरू शकतात. मात्र, कोणताही गोड पदार्थ अति प्रमाणात खाणे टाळावे.

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

डायबिटीजमध्ये खजूर चालतो का?

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी खजूरही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय नियमित खाऊ नये, कारण त्यातही नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते.

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

महत्त्वाची गोष्ट

गोड पदार्थ कोणताही असो—मध, गूळ किंवा साखर, त्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे. मधुमेह असल्यास आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

महागड्या स्किनकेअरची गरज नाही! रोज हे पदार्थ खाल्ल्यास त्वचा दिसेल उजळ

Eat Foods Daily Naturally Glowing Healthy Skin

|

Sakal

येथे क्लिक करा