शरीरात हार्मोन्स बदलल्यावर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका

Puja Bonkile

हार्मोन्स बदल का होतात?

वय, ताणतणाव, चुकीची जीवनशैली, झोपेची कमतरता, आहारातील अनियमितता, गर्भधारणा किंवा थायरॉईडसारख्या समस्यांमुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात, ज्यामुळे शरीराचे संतुलन बिघडू शकते.

वजन वाढणे

जास्त न खाता वजन वाढणे किंवा अचानक वजन कमी होणे हे हार्मोनल असंतुलनाचे लक्षण असू शकते.

मूड स्विंग

वारंवार मूड स्विंग, राग किंवा दुःख हे हार्मोनल बदलांचे लक्षण असू शकते, जे मानसिक आरोग्य आणि दैनंदिन कामांवर परिणाम करू शकते.

झोपेच्या समस्या

हार्मोनल असंतुलनामुळे निद्रानाश, वारंवार झोपेचा त्रास किंवा जास्त झोप येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे दिवसभर थकवा येतो.

त्वचा आणि केसांमध्ये बदल

मुरुमांमध्ये अचानक वाढ, कोरडी त्वचा, केस गळणे किंवा केस पातळ होणे ही हार्मोनल बदलांची सामान्य लक्षणे आहेत, जी विशेषतः महिलांमध्ये दिसून येतात.

थकवा

जास्त काम न करताही सतत थकवा, अशक्तपणा किंवा सुस्तपणा जाणवणे हे हार्मोनल बदलांचे लक्षण असू शकते, ज्यामुळे कामात रस कमी होतो आणि लक्ष केंद्रित कमी होते.

मासिक पाळी

महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी हार्मोनल असंतुलन दर्शवू शकते.

सर्दी-खोकला झाल्यास आहारात कोणता बदल करावा?

cold and cough diet

|

Sakal

आणखी वाचा