होर्मुजच्या समुद्रधुनीतून जहाज सोडण्यासाठी इराण किती पैसे घेतो?

संतोष कानडे

होर्मुजची समुद्रधुनी

इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल युद्धामुळे जगभरात होर्मुजची समुद्रधुनी चर्चेत आहे. येथून अनेक देशांना कच्च्या तेलाची वाहतूक होते.

तीन जहाज

मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने ही समुद्रधुनी बंद केली आहे. मात्र भारताचे तीन जहाज इराणने सोडलेले आहेत.

इराण

या समुद्रधुनीवर जहाज सोडण्यासाठी इराण किती रुपये अकारत होता किंवा टोल घेत होता का, हा प्रश्न सोशल मीडियात चर्चेत आहे.

शुल्क

वास्तविकता अशी आहे की, होर्मुजमधून जाताना इराण अधिकृतपणे कोणतेही शुल्क किंवा ट्रांझिट फी घेत नाही.

टांझिट पॅसेज

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, जहाजांना या समुद्रधुनीतून जाताना इनोसंट पॅसेज किंवा टांझिट पॅसेजचा अधिकार आहे. त्यामुळे इराण अधिकृतपणे शुल्क आकारु शकत नाही.

महसूल

इराणला वेगळ्या मार्गांनी येथून महसूल मिळतो, त्यातले अनेक प्रकार अनधिकृतच आहेत. जहाजांना दिशा दाखवणाऱ्या यंत्रणेचा वापर केल्याचे शुल्क द्यावे लागते.

कोस्ट गार्ड

तसेच लूट किंवा इतर संकटांपासून वाचण्यासाठी इराणच्या कोस्ट गार्डला शुल्क द्यावे लागते.

बंदर

याशिवाय इराणच्या बंदरामध्ये जहाज थांबवायचे असेल तर तज्ज्ञ मार्गदर्शकाची मद घ्यावी लागते. त्यासाठी इराण ५ ते १५ हजार डॉलर शुल्क आकारतो.

जहाज

जर एखादं जहाज इराणच्या कुठल्याही बंदरात दुरुस्तीसाठी किंवा इंधन भरण्यासाठी थांबलेले असेल तर त्याच्या वजनानुसार २ हजार ते १० हजार प्रतिदिन शुल्क आकारला जातो.

संघर्ष

तसेच जर इराणने संघर्षाच्या काळात होर्मुज समुद्रधुनी बंद केली तर वॉर रिस्क इन्शुरन्स २० हजार ते ५० हजार डॉलर म्हणजे १६ ते ४० लाख रुपये इतके पैसे मोजावे लागतात.

सिंहगडावर इंग्रजांनी जप्त केलेल्या सोन्याच्या पेटाऱ्यांचं काय झालं?

<strong>येथे क्लिक करा</strong>