थंड की गरम? कोणते दूध आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे?

सकाळ डिजिटल टीम

दूध

थंड की गरम? नेमके कोणते दूध आरोग्यासाठी चागले आहे आणि थंड दूध पिल्यास कोणते फायदे मिळतात व गरम दूध पिल्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Milk Benefits | sakal

गरम दुधाचे फायदे

रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते. दुधामध्ये 'ट्रिप्टोफॅन' नावाचे अमिनो अॅसिड असते, जे 'सेरोटोनिन' आणि 'मेलाटोनिन' हार्मोन्स तयार करण्यास मदत करते. हे हार्मोन्स झोपेसाठी आवश्यक असतात.

Milk Benefits | sakal

पचनाची समस्या

गरम दूध पचायला सोपे असते. ज्यांना पचनाची समस्या आहे, त्यांना थंड दुधापेक्षा गरम दूध अधिक फायदेशीर ठरू शकते.

Milk Benefits | sakal

घसादुखी

सर्दी किंवा खोकला झाला असेल, तर गरम दूध एक उत्तम उपाय आहे. हळद घालून गरम दूध प्यायल्यास घसादुखी आणि सर्दीच्या लक्षणांपासून आराम मिळण्यास मदत होते.

Milk Benefits | sakal

व्हिटॅमिन डी

गरम दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे, जे हाडांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Milk Benefits | sakal

थंड दुधाचे फायदे

थंड दूध ऍसिडिटी आणि छातीत होणाऱ्या जळजळीसाठी एक प्रभावी घरगुती उपाय मानले जाते. त्यात असलेले कॅल्शियम हे ऍसिड तयार होण्यापासून थांबवते.

Milk Benefits | sakal

शरीराचे तापमान

उष्णतेच्या दिवसांत थंड दूध प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

Milk Benefits | sakal

पाण्याची कमतरता

थंड दूध हे एक उत्तम हायड्रेटिंग पेय आहे, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Milk Benefits | sakal

कोणते दूध चांगले?

तुम्हाला चांगली झोप, पचनक्रिया सुधारणे आणि सर्दीपासून आराम हवा असेल, तर गरम दूध अधिक उपयुक्त आहे. तुम्हाला ऍसिडिटीची समस्या असेल, वजन कमी करायचे असेल किंवा उन्हाळ्यापासून आराम हवा असेल, तर थंड दूध तुमच्यासाठी चांगले आहे.

Milk Benefits | sakal

महिलांनी उत्तम आरोग्यासाठी 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

येथे क्लिक करा