Hot Wine: ऐकून थक्क व्हाल! या देशात थंडीत पितात चक्क गरम वाईन, कारण आहे खास

Monika Shinde

गरम वाईनची अनोखी परंपरा

जगभरात वाईन थंड पिण्याची सवय असते. मात्र एका युरोपीय देशात थंडीच्या दिवसांत वाईन चक्क गरम करून प्यायली जाते.

Hot Wine

|

Esakal

कोणता आहे तो देश?

जर्मनीमध्ये थंडीच्या काळात गरम वाईन पिण्याची जुनी परंपरा आहे. ही वाईन खास करून ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवसांत प्यायली जाते.

Hot Wine

ख्रिसमस बाजारातील आकर्षण

जर्मनीतील ख्रिसमस बाजारात खरेदीसोबत खाद्यपदार्थांची मेजवानी असते. या बाजारातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गरम वाईन.

Hot Wine

ग्लुवाईन म्हणजे काय?

गरम वाईनला जर्मनीत ग्लुवाईन किंवा मल्ड वाईन म्हणतात. वाईन गरम करून त्यात मसाले आणि गोड पदार्थ मिसळले जातात.

Hot Wine

मसाल्यांचा खास स्वाद

या वाईनमध्ये दालचिनी, लवंग, जायफळ, आले, काळी मिरी यांसारखे मसाले घातले जातात. त्यामुळे चव आणि सुगंध वाढतो.

Hot Wine

थंडीत फायदेशीर

गरम वाईन शरीराला उब देते. थंडीपासून संरक्षण, सर्दी-खोकल्यावर आराम मिळावा म्हणूनही ही वाईन उपयुक्त मानली जाते.

Hot Wine

इतिहासही आहे जुना

गरम वाईनचा उल्लेख प्राचीन ग्रीक आणि रोमन काळातील साहित्यात आढळतो. ही परंपरा शतकानुशतके टिकून आहे.

Hot Wine

Hot Wineआजही लोकप्रिय

आज गरम वाईन केवळ जर्मनीपुरती मर्यादित नाही. युरोपमधील अनेक देशांत थंडीच्या दिवसांत हे पेय आवडीने प्याले जाते.

Hot Wine

भोगी व संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे कपडे घालू नका, नाहीतर…

येथे क्लिक करा