हॉटेल भाग्यश्रीच्या चवीचं सिक्रेट सापडलं! नाद करू नका, नोंद करून घ्या

संतोष कानडे

प्रसिद्ध

'नाद करतो काय, यायलाच लागतंय हॉटेल भाग्यश्री' असा डायलॉग मारुन हॉटेल मालक नागेश मडके हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहेत.

ब्लॅक फॉर्च्युन

ब्लॅक फॉर्च्युनर काढल्यानंतर मडके हे प्रसिद्धीच्या शिखरावर होते. दररोज दहा-पंधरा-वीस असे बोकडं ते कापतात.

मटण थाळी

२५० रुपयांमध्ये चवदार अनलिमिटेड बोकड मटण थाळी, यामुळे त्यांच्या हॉटेलसमोर दोन-दोन किलोमीटरच्या गाड्यांच्या रांगा असतात.

तुळजापूर

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरजवळ हे हॉटेल भाग्यश्री आहे. नेहमीच हॉटेल बंद ठेवल्याने लोक मालकाला ट्रोल करत असतात.

हॉटेल भाग्यश्री

मुळात भाग्यश्री हॉटेलच्याच मटणाला चव आहे का? हा खरा प्रश्न आहे. या परिरात आणखीही फेमस हॉलेटल्स आहेत.

उस्मानाबादी शेळी

खरंतर उस्मानाबादी शेळी देशात प्रसिद्ध आहे. त्याची अनेक कारणं आहेत. यातलं मूळ कारण आहे चव.

संपन्न

उस्मानाबादी शेळी एक अशी जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन संपन्न झालं. एका शेळीपासून ४०-५० शेळ्यांचा फार्म बनवणारे अनेक शेतकरी आहेत.

चविष्ट मांस

उच्चतम रोग प्रतिकारशक्ती तसेच उष्ण हवामानास सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता, जुळे व तिळे देण्याचे प्रमाण अधिक, अशी शेळीची वैशिष्ट्ये आहेत.

उस्मानाबादी शेळी

उस्मानाबादी शेळी चविष्ट मांसासाठी ओळखली जाते. साधारण ३ ते ४ महिन्यांचे बोकड ‘लीन मीट’साठी प्रसिद्ध आहे.

खरेदीदार

बोकडांना बाजारात बाराही महिने मागणी असते. खरेदीदार काळ्या रंगाच्या बोकडाची वाढीव दराने खरेदी करतात.

बोकड

साधारणपणे ६ महिन्यांचे बोकड २२ ते २५ किलो, तर १२ महिन्यांचे बोकड ३० ते ३५ किलोपर्यंत भरते. एक वर्ष वयाच्या शेळीचे वजन ३० ते ३५ किलोपर्यंत मिळते.

कामोत्तेजनेसाठी मुघल काय खायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>