Hotel Checkout: हॉटेलमधून काय घेऊन जाऊ शकता? ‘या’ वस्तूंना हात लावला तर दंड!

Vinod Dengale

हॉटेल वस्तू

हॉटेलमध्ये राहिल्यावर छोट्या वस्तू घरी नेण्याचा मोह होतो ना? पण थांबा! सगळंच फ्री नसतं. काही वस्तू “कॉम्प्लिमेंटरी” असतात, तर काही हॉटेलची मालमत्ता असते.

हे नेऊ शकता

शॅम्पू, कंडिशनर, बॉडी लोशनसारख्या मिनी टॉयलेटरीज तुम्ही घेऊन जाऊ शकता.

साबण

साबण, शॉवर कॅप, डेंटल किट आणि शेविंग किटही तुमच्यासाठीच असतात.

सॅशे

डिस्पोजेबल स्लिपर्स आणि चहा-कॉफी सॅशे घेण्यात काहीच हरकत नाही.

या वस्तू नाही

पण टॉवेल आणि बाथरोब हे हॉटेल पुन्हा वापरतं त्यामुळे ते घरी नेण्याचा विचारही करू नका!

हॉटेलची मालमत्ता

बेडशीट, उशा आणि इलेक्ट्रॉनिक्स (किटली, हेअर ड्रायर), ग्लास, चमचे, हँगर्स आणि सजावटीच्या वस्तूही हॉटेलचीच मालमत्ता असतात.

दंड

त्यामुळे चुकूनही या वस्तू बॅगेत ठेवल्या, तर चेकआउटवेळी दंड लागू शकतो.

ओला-उबरला पर्याय! मुंबईत ‘भारत टॅक्सी’ला सेवा सुरु, किती द्यावं लागणार भाडं?

Bharat Taxi Launched in Mumbai

|

esakal

हेही वाचा