Aarti Badade
मटन – १ किलो,तेल – आवश्यकतेनुसार,कांदे – ४-५ मध्यम आकाराचे, बारीक चिरलेले,हळद, हिंग – चवीनुसार,गरम मसाल्याची पूड – १ चमचा,मीठ – चवीनुसार,कोथिंबीर – बारीक चिरून
हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या – ५–६,आले – १ इंच तुकडा,हे सर्व एकत्र वाटून तयार ठेवा.
एका कढईत तेल गरम करून कांदा खरपूस परतून घ्या. त्यानंतर त्यात हळद आणि हिंग टाका.
आता त्यात मटनाचे लहान तुकडे घाला आणि चांगले परतून घ्या. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत परतत राहा.
पातेल्यावर झाकण ठेवा आणि झाकणात थोडे पाणी घाला. मटन शिजेपर्यंत झाकण उघडू नका!
मटन शिजल्यावर गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. त्यात गरम मसाला आणि मीठ टाकून चांगले ढवळा.
आच बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. आणि तयार आहे तुमचं झटपट सुकं मटन!