House Wall Advertisement : घराच्या भिंतीवर जाहिरात लावल्यास किती पैसे मिळतात? दिवसभरात किती लोक पाहतात?

Sandeep Shirguppe

घराच्या भिंतीवर जाहिरात लावली तर किती पैसे मिळतात?

शहरांपासून गावांपर्यंत घरांच्या, दुकानांच्या आणि मोकळ्या भिंतींवर कंपन्यांच्या जाहिराती पाहायला मिळतात. पण अशा जाहिरातींसाठी भिंतमालकाला किती पैसे मिळतात, हे जाणून घेऊया.

House Wall Advertisement

|

esakal

भिंतीसाठी ठरलेला रेट नाही

जाहिरातीसाठी भिंत देताना देशभर लागू असा कोणताही अधिकृत दर नाही. पैसे किती मिळणार, हे लोकेशन आणि भिंतीच्या आकारानुसार ठरते.

House Wall Advertisement

|

esakal

गावात अनेकदा पैसे मिळत नाहीत

गावांमध्ये किंवा छोट्या भागांत काही वेळा भिंतीवर जाहिरात करण्यासाठी मालकाला पैसे दिले जात नाहीत. त्याऐवजी भिंत मोफत रंगवून देण्याची ऑफर दिली जाते.

House Wall Advertisement

|

esakal

लोकेशननुसार वाढतो दर

हायवे, बाजारपेठ, मुख्य रस्ता किंवा गर्दीच्या ठिकाणी असलेल्या भिंतीला अधिक दर मिळू शकतो. कारण अशा ठिकाणी जाहिरात जास्त लोकांना दिसते.

House Wall Advertisement

|

esakal

दिवसभरात किती लोक पाहतात?

भिंतीवरून दररोज किती वाहने किंवा लोक जातात, जाहिरात रस्त्यावरून किती स्पष्ट दिसते आणि भिंतीसमोर अडथळे आहेत का, याचाही दर ठरवताना विचार केला जातो.

House Wall Advertisement

|

esakal

स्क्वेअर फुटानुसारही पैसे

काही ठिकाणी भिंतीच्या क्षेत्रफळानुसार म्हणजेच प्रति स्क्वेअर फुट दर ठरवला जातो. छोट्या शहरांत साधारण १ ते ३ रुपये, तर सामान्य शहरांमध्ये २ ते ६ रुपये प्रति स्क्वेअर फुट असा अंदाज सांगितला जातो.

House Wall Advertisement

|

esakal

प्राइम लोकेशनला जास्त कमाई

व्यस्त बाजारपेठ किंवा मुख्य रस्त्यावरील भिंतीसाठी ५ ते १० रुपये किंवा त्याहून अधिक प्रति स्क्वेअर फुट दर मिळू शकतो. मात्र प्राइम लोकेशननुसार रक्कम वेगळी ठरू शकते.

House Wall Advertisement

|

esakal

जाहिरात एजन्सी करते व्यवहार

कंपन्या अनेकदा थेट भिंतमालकाशी व्यवहार करत नाहीत. जाहिरात एजन्सी किंवा आउटडोअर जाहिरात कंपन्या भिंतीची निवड करून मालकाशी पैसे आणि कालावधीबाबत करार करतात.

House Wall Advertisement

|

esakal

tiger

|

esakal

आणखी पाहा...