वाघ माणसावर हल्ला करण्यापूर्वी कोणते संकेत देतो?

संतोष कानडे

वाघ

वाघ सामान्यतः माणसाला टाळण्याचा प्रयत्न करत असतो. अचानक हल्ला करणे ही नेहमीची बाब नाही.

वर्तन

मात्र वाघाला धोका वाटला किंवा तो चिडला तर त्याच्या वर्तनात काही इशारे दिसू शकतात.

गुरगुरणे

वाघ अस्वस्थ झाल्यास गुरगुरणे किंवा फुसफुसण्यासारखे आवाज काढू शकतो.

संकेत

तो कान मागे घेणे, शेपटी जोरात हलवणे किंवा शरीर ताठ ठेवणे असे संकेत देऊ शकतो.

हल्ला

वाघ सतत एखाद्या ठिकाणी लक्ष ठेवत असेल तर तो हल्ला करणार, हे ठरलेलं असतं.

जंगल

जंगलात फिरताना वाघ एखाद्याकडे सरळ येत असेल किंवा अंतर कमी करत असेल तर परिस्थिती गंभीर असू शकते.

वन विभाग

जंगलात वाघाला पळवून लावण्याचा किंवा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न वन विभागाचे कर्मचारीही करीत नाहीत.

सुरक्षित अंतर

वाघाच्या वर्तनाचा अंदाज लावण्यापेक्षा त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखणे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे.

वाघ सर्वात जास्त कुणाला घाबरतो?

<strong>येथे क्लिक करा</strong>