Aarti Badade
कोलकात्यातील नोबिनचंद्र दास यांच्या मिठाईच्या दुकानात एक चूक झाली… आणि तयार झाली जगप्रसिद्ध ‘रसमलाई’!
रसगुल्ला तयार करत असताना काही छेण्याचे गोळे चुकून गोड, गरम रबडीमध्ये पडले. चव बघितली… तर अप्रतिम!
गोडसर रबडी, केशर, वेलची आणि मेव्यांनी सजवलेले रसगुल्ले – आणि अशा प्रकारे तयार झाली ‘रसमलाई’!
१९व्या शतकाच्या शेवटी कोलकात्यात रसमलाईचा जन्म झाला. लोकांनी या नव्या गोडीला जबरदस्त प्रतिसाद दिला!
नोबिनचंद्र दास यांचे पुत्र के.सी. दास यांनी रसमलाईचे उत्पादन व्यवस्थित सुरू केले – आणि तिला ‘रसमलाई’ हे नाव दिले!
बंगालमध्ये जन्मलेली ही मिठाई आज भारतात आणि परदेशातसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे!
काही इतिहासकारांचं म्हणणं आहे: रसगुल्ला आणि रबडीचं मिलन ‘चुकून’ नाही, तर जाणूनबुजून केलेला प्रयोग होता.
कोलकात्याच्या शोभाबाजारमध्ये आजही नोबिनचंद्र दास अँड सन्स ही मूळ मिठाईची दुकान कार्यरत आहे.
२०१७ मध्ये “बंगालचा रसगुल्ला” याला GI टॅग मिळाला. त्याच दुकानातून रसमलाईचीही सुरुवात झाली होती!
इतिहास, चव आणि परंपरेचा संगम असलेली रसमलाई – कोलकात्यात गेलात तर ‘नोबिनचंद्र दास’ दुकानात जाऊन चाखायलाच हवी!