Mansi Khambe
'बेस्ट' (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) उपक्रम शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी 'बेस्ट दिन' साजरा केला जात आहे. मुंबईच्या सेवेतील १२१ वर्षांचा हा प्रवास साजरा करत केला जात आहे.
BEST Bus History
ESakal
घोड्यांच्या ट्रॅम आणि इलेक्ट्रिक ट्रॅमपासून ते शहराच्या ओळखीचा भाग बनलेल्या लाल बसेस आणि वीज वितरणाच्या विश्वसनीय जाळ्यापर्यंत, 'बेस्ट' मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
BEST Bus History
ESakal
जॉर्ज आल्वा किर्टीज आणि विल्यम फ्रेंच स्टर्न्स यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे ट्रामवेज कंपनीच्या घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रामपासून बेस्टचा इतिहास सुरू होतो.
BEST Bus History
ESakal
नंतर ट्राम चालविण्यासाठी विजेची गरज लागली आणि ही कंपनी बंद होऊन १९०५ साली 'बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कं. लि.' (बेस्ट कं.) ची स्थापना झाली.
BEST Bus History
ESakal
सुरुवातीच्या काळात बसमार्ग इंग्रजी वर्णाक्षरात, तर ट्राम मार्ग अंक/आकड्यात दिले जात होते. त्यानंतर इंग्रजी वर्णाक्षरे अपुरी पडल्याने ए-१, बी-१ या प्रकारे नावे देणे सुरू झाले. नंतर १९५९ पासून बसमार्ग अंकांत सुरू झाले.
BEST Bus History
ESakal
१९५३ साली ट्रामसेवा कमी करून बसगाड्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे ३१ मार्च १९६४ रोजी ट्राम बोरीबंदरहून दादर टी.टी. या अखेरच्या प्रवासाला निघाली अन् मुंबईतील ट्रामसेवेचे पर्व कायमचे बंद झाले.
BEST Bus History
ESakal
जुन्या ओम्नी बसमध्ये थ्रॉनीक्रॉफ्ट (१९२६), डॉज (१९२७), डॅमलर (१९२८), थ्रॉनीक्रॉफ्ट चारबंक पर्यटन बस (१९२८) जी एम सी (१९३०), ए इ सी (१९३१), लेलँड (१९३१), आल्बियन (१९३३), गाय अरब (१९५०) इ. प्रकारचा बसताफा असे.
BEST Bus History
ESakal
१९३७ साली डॅमलरच्या दुमजली बसेस आल्या, १९६७ साली आलेल्या दुमजली ट्रेलर बसेस १९८५ पर्यंत होत्या. तर जानेवारी १९९७ मध्ये पर्यावरणस्नेही सी़ एन.जी. बसगाड्या दाखल झाल्या.
BEST Bus History
ESakal
जुन्या बसच्या सांगाड्याच्या बांधणीत धातूसह लाकडाचा वापर केला जात होता. १९५३ नंतर या बांधणीत आमूलाग्र बदल होत, बस बॉडी बांधणीत धातूचा वापर होऊ लागला.
BEST Bus History
ESakal
तसेच प्रवाशांच्या व ड्रायव्हर-कंडक्टरच्या सोयी लक्षात घेऊन आसनव्यवस्था, बसच्या दरवाजांची स्थाने, आकार, रंगसंगती, दर्जा इत्यादीत बदल केला आणि बसचे रंगरूप पालटू लागले.
BEST Bus History
ESakal
७ ऑगस्ट १९४७ रोजी बेस्ट कंपनी मुंबई पलिकेच्या ताब्यात आली आणि बेस्टचे देशातील पहिल्या 'सार्वजनिक उपक्रमात' रूपांतर झाले.
BEST Bus History
ESakal
Railway Train Wheel Cost
ESakal