Mansi Khambe
लहानपणापासून आजपर्यंत, तुम्हाला ट्रेनबाबत अनेक प्रश्न पडले असतील. ज्यामध्ये ट्रेनला किती चाके असतात आणि त्यांचं वजन किती असतं?
Railway Tyre Count and weight
ESakal
बहुतेक लोकांना वाटते की ती मोजणे खूप कठीण आहे. पण खूप सोपी पद्धत आहे. चला तर मग, जाणून घेऊया की ट्रेनला किती चाके असतात आणि ती कशी मोजायची. तसेच रेल्वेच्या एका चाकाचे वजन किती असते.
Railway Tyre Count and weight
ESakal
प्रत्येक डब्याला खाली दोन बोगी जोडलेल्या असतात आणि प्रत्येक बोगीला चार चाके असतात. याचा अर्थ प्रत्येक डब्याला एकूण ८ चाके असतात.
Railway Tyre Count and weight
ESakal
जर ट्रेनला २० डबे असतील, तर फक्त डब्यांनाच १६० चाके असतात. इंजिनची चाके वेगळी जोडलेली असतात. बहुतेक डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनांना ६ एक्सल असतात, म्हणजेच इंजिनला १२ चाके असतात.
Railway Tyre Count and weight
ESakal
प्रत्येक ट्रेनच्या चाकांची संख्या वेगवेगळी असते, कारण ती पूर्णपणे जोडलेल्या डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते. एक्सप्रेस गाड्यांना २४ पर्यंत डबे असू शकतात, तर लोकल किंवा पॅसेंजर गाड्यांना त्याहून कमी डबे असू शकतात.
Railway Tyre Count and weight
ESakal
ट्रेनला १६ डबे असतील, तर १२८ चाके असतात. २० डब्यांना १६० चाके, २२ डब्यांना १७६ चाके तर २४ डब्यांना १९२ चाके असतात.
Railway Tyre Count and weight
ESakal
वेगाने धावणाऱ्या ट्रेनची चाके मोजण्यासाठी रेल्वे 'ॲक्सल काउंटर' या बुद्धिमान तंत्रज्ञानाचा वापर करते. ट्रेनच्या दोन विरुद्ध चाकांना जोडणाऱ्या लोखंडी दांड्याला 'ॲक्सल' म्हणतात.
Railway Tyre Count and weight
ESakal
हे यंत्र थेट चाकांऐवजी ॲक्सलची गणना करते. हा एक प्रकारचा हाय-टेक सेन्सर आहे, जो रुळांच्या बाजूने लावलेला असतो. पूर्वी हे काम यांत्रिक पद्धतीने केले जात असे, परंतु आजकाल विद्युत किंवा फायबर ऑप्टिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
Railway Tyre Count and weight
ESakal
सर्वात जड चाके सामान्यतः EMU/मेमू किंवा लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये आढळतात, ज्याचे वजन अंदाजे ४२३ किलो असते.
Railway Tyre Count and weight
ESakal
सामान्य ब्रॉड गेज ट्रेनच्या डब्यात बसवलेल्या एका चाकाचे वजन ३८४ ते ३९४ किलो असते. आधुनिक लाल रंगाच्या LHB कोचमधील एका चाकाचे वजन सुमारे ३२६ किलो असते.
Railway Tyre Count and weight
ESakal
डिझेल इंजिनच्या एका चाकाचे वजन ५२८ किलो, तर इलेक्ट्रिक इंजिनच्या चाकाचे वजन ५५४ किलो तर नॅरो गेज ट्रेनच्या इंजिनची चाके १४४ किलो वजनाची असतात.
Railway Tyre Count and weight
ESakal
Taro Leaves Benefits
esakal