Sandip Kapde
८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंहांना दिल्ली येथे अटक करण्यात आली.
अटकेनंतर काही काळाने त्यांना लाहौरच्या तुरुंगात हलवण्यात आले.
ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते.
तुरुंगवासात त्यांनी धानसाधना न करता दिशाबद्ध अभ्यास केला.
७१३ दिवसांत त्यांनी तब्बल ३०२ ग्रंथ वाचले.
लाहौरच्या द्वारकादास ग्रंथालयाचे ग्रंथपाल, त्यांचे मित्र, त्यांना सतत पुस्तकं पुरवत होते.
या काळात त्यांनी ४ महत्त्वाचे ग्रंथ लिहून काढले – Idea of Socialism, Autobiography, History of Revolutionary in India, At the Door of Death.
“Why I am an Atheist” हा प्रभावी लेख देखील त्यांनी लिहला.
हे सर्व साहित्य तुरुंगातून बाहेर कसे पडले हा प्रश्न अनेकांना पडतो.
भगतसिंहांनी हे साहित्य कुमारी लज्जावती देवी यांच्या हातून गुप्तपणे तुरुंगाबाहेर पाठवले.
लज्जावती ह्या डिफेन्स कमिटीच्या सेक्रेटरी असल्याने त्यांना तुरुंगात नेहमी येण्याजाण्याची परवानगी होती.
लज्जावती यांनी त्यातील काही साहित्य पिपल वृत्तपत्राचे संपादक फिरोज चंद यांच्याकडे दिला.
भवानी तलवार शिवरायांना कुठे मिळाली? तिची किंमत किती होती?