Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचा इतिहास गूढ आणि आकर्षक आहे. अनेक तर्क, मौखीक संदर्भ आणि बखरींमध्ये विविध उल्लेख आढळतात.
'जगदंबा', 'तुळजा' आणि 'भवानी' या शिवरायांच्या तलवारींपैकी भवानी तलवार सर्वाधिक चर्चेत राहिली. ती नेमकी कुठे मिळाली यावर आजही वाद आहे.
लखम सावंत आणि शिवरायांमध्ये 1659 ला तह झाला. यावेळी भेटीदाखल सावंतवाडी संस्थानमार्फत पोर्तुगीज बनावटीची, हिरेजडीत मुठ असलेली तलवार दिल्याचा दावा केला जातो.
काही बखरींनुसार गोवले गावातील सावंत घराण्याने शिवरायांना तलवार दिली. तिला 'श्री तुळजा फिरंग' असे नाव होते.
गोवलेकर सावंतांच्या सैन्याने बांदा बंदरावर ओहोटीमुळे अडकलेल्या पोर्तुगीज जहाजावर हल्ला केला. त्यातून रत्नजडीत मुठीची तलवार हाती लागली.
7 मार्च 1659 रोजी सप्तकोटीश्वर मंदिरात शिवरायांना ही तलवार भेट दिल्याचा मौखीक संदर्भ आहे. मात्र बखरींमध्ये थेट पुरावा नाही.
शिवरायांनी तलवार दिल्याबद्दल गोवलेकर सावंतांना 300 होन बक्षीस दिल्याचे लिखित उल्लेख 'शोध भवानी तलवारीचा' पुस्तकात आहेत.
त्या काळात 300 होन हे अत्यंत मोठे बक्षीस होते. आजच्या काळात याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या आसपास असू शकते, असा अंदाज आहे.
काही अभ्यासकांच्या मते शिवरायांकडे भवानी देवीच्या नावाने एक नव्हे तर किमान तीन तलवारी असाव्यात.
भवानी तलवार सावंतवाडी, गोवले किंवा इतरत्र कुठून आली याचा ठोस पुरावा नाही. पण ही तलवार आजही मराठा इतिहासातील अभिमानाचा आणि रहस्याचा भाग आहे.