Pranali Kodre
भारतातील अनेक राज्यात वाढलेली एक अशी वनस्पती आहे, जी निसर्गाचं प्रचंड नुकसान करत आहे.
India most hated tree
Sakal
ही वनस्पती म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतात प्रामुख्याने ओळखली जाणारी 'विलायती बाभळ' किंवा 'येडी बाभूळ', जिचं शास्त्रीय नाव आहे प्रोसोपिस जुलीफ्लोरा (Prosopis juliflora).
India most hated tree
Sakal
ही विलायती बाभळ मुळचे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील एक काटेरी झाड असून ब्रिटिशांनी १८७०-८० च्या दशकात ते भारतात आणले.
India most hated tree
Sakal
ब्रिटिशांना जळण्यासाठी लाकूड देणारं, जमिनीची धूप थांबवणारं आणि हिरवळ देणारी वनस्पती हवी होती, म्हणून त्यांनी ही भारतात आणली.
India most hated tree
Sakal
त्यानंतर १९३० च्या दशकात जोधपूरच्या राजाने या विलायती बाभळीची बियाणं विमानाच्या माध्यमातून राजस्थानमध्ये टाकली, असे अनेक रिपोर्ट्स सांगतात.
India most hated tree
Sakal
पण, यानतंर ही वनस्पती संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वाढली असून पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे.
India most hated tree
Sakal
हे झाड अत्यंत वेगात वाढतं आणि कमी पाण्यात किंवा दुष्काळातही जगू शकतं. वेगानं वाढत असल्याने आणि पानांमधील एका विशिष्ट रसायनामुळे ते आसपास इतर झाडांना वाढूही देत नाही.
India most hated tree
Sakal
या झाडाची मूळं अत्यंत खोलवर जात असल्याने जमिनीतील खोलवरचं पाणी शोषून घेतात. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी खालवते. विहिरी, बोअरबेलला पाणी न लागण्याचा धोका संभावतो.
India most hated tree
Sakal
शेतात आणि कुरणांमध्ये हे विलायती बाभळ पसरल्यास ती काढणं कठीण असतं, ज्यामुळे जमीन पडीक बनण्याचा धोका संभावतो.
India most hated tree
Sakal
शेळ्या मेंढ्यांनी पाला खावून याच्या बिया पसरवल्या आहेत. पण या झाडाचे काटे लागून अनेक जनावरांना दुखापतही होते.
India most hated tree
Sakal
या झाडाला फक्त वरून कापलं, तर ते दुप्पट वेगाने वाढते, त्यामुळे त्याला मुळासकटच उपटावे लागते.
India most hated tree
Sakal
हे झाड इतकं धोकादायक आहे की मद्रास न्यायालयाने मुळापासून उपटून टाकण्याचे आदेश दिलेत. तसेच विविध राज्यात हे झाड काढण्याच्या मोहिमा सुरू झाल्यात.
India most hated tree
Sakal
Cotton Rose The Color-Changing Flower
Sakal