रद्द केलेला अन्न परवाना पुन्हा सुरू करता येतो का? नियम जाणून घ्या

Mansi Khambe

परवाना

स्टॉल असो, रेस्टॉरंट असो किंवा मोठी खाद्य कंपनी, परवान्याशिवाय व्यवसाय चालवणे बेकायदेशीर मानले जाते. अनेकदा, नियमांचे पालन न केल्यामुळे हा परवाना निलंबित किंवा रद्दही केला जातो.

Cancelled License renew

|

ESakal

परवाना रद्द

कोणताही खाद्य व्यवसाय चालवण्यासाठी FSSAI परवाना किंवा नोंदणी मिळवणे अनिवार्य आहे. पण एकदा परवाना रद्द झाल्यावर तो पुन्हा मिळवता येतो का. याबाबत नियम जाणून घ्या.

Cancelled License renew

|

ESakal

कायदा

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३२ नुसार, परवाना प्राधिकरणाला कोणत्याही खाद्य व्यवसायाचा परवाना किंवा नोंदणी निलंबित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे.

Cancelled License renew

|

ESakal

कारणे

दुकानात किंवा कारखान्यात स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे, मुदत संपलेला माल वापरणे, खोटी माहिती वापरून परवाना मिळवणे किंवा परवान्याचे वेळेवर नूतनीकरण न केल्याने परवाना रद्द केला जातो.

Cancelled License renew

|

ESakal

तक्रारी

याव्यतिरिक्त, अन्न विषबाधेच्या तक्रारी आल्यास किंवा ग्राहकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास प्राधिकरण थेट कारवाई करू शकते.

Cancelled License renew

|

ESakal

सुधारण्याची संधी

अन्न व्यवसाय चालकाला एक सुधारणा सूचना दिली जाते, ज्यामध्ये आवश्यक सुधारणांचा तपशील असतो. विहित वेळेत सुधारणा न केल्यास परवाना प्रथम निलंबित होतो आणि तरीही सुधारणा न झाल्यास तो रद्द केला जातो.

Cancelled License renew

|

ESakal

नियम

नियमांनुसार, जर अन्न व्यवसाय चालकाचा परवाना रद्द झाला, तर ते रद्द झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर पुन्हा नवीन परवान्यासाठी अर्ज करू शकतात.

Cancelled License renew

|

ESakal

अट

तथापि, यासाठी एक पूर्वअट अशी आहे की, सुधारणा सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्रुटी पूर्णपणे दूर केलेल्या असाव्यात. सर्व त्रुटी दूर झाल्या आहेत याची प्राधिकरणाची खात्री पटल्यावरच नवीन परवाना दिला जातो.

Cancelled License renew

|

ESakal

वैधता

FSSAI परवान्याची वैधता १ ते ५ वर्षांपर्यंत असते आणि मुदत संपण्याच्या ३० दिवस आधी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जर नूतनीकरण वेळेवर केले नाही, तर ठराविक कालावधीनंतर परवाना आपोआप रद्द होतो.

Cancelled License renew

|

ESakal

देवाला नारळ का फोडतात? या परंपरेमागे दडलंय खास कारण

येथे क्लिक करा