Mansi Khambe
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे.
job at Ambani residence
ESakal
जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक म्हणून अंबानी त्यांची अलिशान जीवनशैली आणि मोठे व्यावसायिक निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
job at Ambani residence
ESakal
मात्र अंबानींच्या मुंबईतील आलिशान घर अँटिलियामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार किती असतो हे तुम्हाला माहित आहे का? तसेच तेथे काम करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे? याबाबत जाणून घ्या.
job at Ambani residence
ESakal
अंबानी यांच्या घरात काम करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. जिथे लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड केल्यांनतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पुढच्या मुलाखतीसाठी बोलावले जाते.
job at Ambani residence
ESakal
या भरती प्रक्रियेनंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते, ज्यासाठी विविध एजन्सींना टेंडर दिले जाते.
job at Ambani residence
ESakal
तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याचे ओळखपत्र मागविले जाते. ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्ता पुरावा अशी महत्त्वाची कागदपत्रे जमा केली जातात.
job at Ambani residence
ESakal
अंबानींच्या घरी नोकरी मिळवण्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे संबंधित क्षेत्रात व्यावसायिक प्रमाणपत्र आणि अनुभव असणे गरजेचे आहे. उदा. स्वयंपाकघरात काम करणाऱ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंटचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
job at Ambani residence
ESakal
निवडीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला विशेष प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये घर साफसफाई, जेवण बनवणे किंवा इतर कोणत्याही कामाचा समावेश आहे.
job at Ambani residence
ESakal
अंबानींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची भूमिका, पात्रता आणि अनुभवाच्या आधारे प्रति महिना ५० हजार ते २ लाख रुपये इतका पगार मिळतो.
job at Ambani residence
ESakal
तर मीडियाच्या अहवालानुसार अंबानी कुटुंबाचे त्यांच्या घरातील स्वयंपाकघर जागतिक दर्जाचे राहण्यासाठी खाजगी शेफला कोट्यवधी रुपयांचे पॅकेज दिले जाते.
job at Ambani residence
ESakal