सूरज यादव
कन्नड अभिनेत्री रन्या रावला दुबईहून १४ किलो सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केलीय. केरळच्या राजकीय वर्तुळात वरपर्यंत ओळख असलेल्या स्वप्ना सुरेशवरही तस्करीचे आरोप आहेत.
भारतात सोनं तस्करीच्या घटनांमध्ये बहुतांशवेळा दुबईहून सोनं आणल्याचं आढळलंय. दुबई किंवा आखाती देशातूनच ही तस्करी सर्वाधिक होते.
दुबईतूनच सोन्याची तस्करी का होते? किती स्वस्त सोनं विकलं जातं आणि का असे प्रश्न अनेकांना पडतात.
दुबईतून भारतात सोन्याची तस्करी होण्यामागचं मुख्य कारण भारताच्या तुलनेत दुबईत सोनं स्वस्त असणं हे आहे.
भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत सध्या ८४ ते ८८ हजार इतकी आहे. यात १५ टक्के आयात शुल्क असते. याशिवाय मजुरी आणि स्थानिक करही वेगळा असतो.
भारतात मजुरी दर हा ५ टक्क्यांपासून २५ ते २८ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे सोन्याची किंमत दागिने घडवताना १० ग्रॅमसाठी एक लाखापर्यंतही पोहोचते.
भारताच्या तुलनेत दुबईत मात्र सोनं २ ते ४ हजार स्वस्त असतं. सध्या तिथं सोन्याची किंमत ८२ हजार रुपये इतकी आहे. जगभरात सोन्याच्या किंमती बदलल्या तरी भारतापेक्षा कमी किंमतीत तिथं सोनं विकलं जातं.
दुबईत सोन्याच्या खरेदीवर कोणताही कर लावला जात नाही. आंतरराष्ट्रीय मार्केटच्या तुलनेत किरकोळ वाढीसह त्याच किंमतीत दुबईत सोनं मिळतं.
दुबईत एक किलो सोनं तस्करी करून आणलेल्या सोन्यामुळे सरकारचं नुकसान होतं तर तस्करांचा फायदा होतो. ८२ लाखांच्या एक किलो सोन्यावर १४ लाख रुपये कर आणि इतर खर्च होतो.
युएई आणि खाडी देशातून तस्करीचं कारण म्हणजे हे देश भारतापासून खूपच जवळ आहेत. या देशात प्रवास करणं सोपं असून कमी खर्चिक आहे.
शंभर वर्षांपूर्वी भारतातील महिलांचं जीवन कसं होतं?