सकाळ डिजिटल टीम
दालचिनी ही जळपास सर्वाच्याच घरात वापरली जाते. दालचिनी, एक लोकप्रिय मसाला आहे.
ही दालचिनी बनवण्याची प्रक्रिया काय आहे तुम्हाला माहित आहे का? दालचिनी कशी बनवली जाते जाणून घ्या
दालचिनीचा मसाला दालचिनीच्या झाडाच्या (Cinnamomum verum) सालीतून मिळवला जातो.
जेव्हा झाड सुमारे दोन वर्षांचे होते, तेव्हा शेतकरी झाडाची साल कापतात आणि बुंध्याला मातीने झाकतात. यामुळे झाड झुडपासारखे वाढते आणि पुढील वर्षी नवीन कोंब येतात.
दालचिनी बनवण्यासाठी याच कोंबांचा वापर केला जातो.
झाडाची काढलेली साल उन्हात वाळवतात, ज्यामुळे ती कडक आणि कुरकुरीत होते.
वाळलेली साल बारीक करून दालचिनी पावडर बनवतात किंवा ती काड्यांच्या स्वरूपात विकली जाते.
दालचिनीचा उपयोग अनेक पदार्थांमध्ये चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो.
दालचिनीच्या सालीतून आवश्यक तेल काढले जाते, जे सुगंधित उत्पादनांमध्ये वापरले जाते.